टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनने त्याच्या आत्मचरित्रात खास आठणींना उजाळा दिला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावेळी घडलेला किस्साही शिखर धवनने शेअर केला आहे.

मुंबई : टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन केवळ त्याच्या फलंदाजीसाठीच नव्हे, तर त्याच्या बेफिकीर आणि आनंदी स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे. मैदानावर जितका तो आत्मविश्वासाने खेळतो, तितकाच तो मैदानाबाहेरही बिनधास्त जीवन जगतो. त्याच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात, धवनने त्याच्या तरुणपणातील एका खास आठवणीचा उल्लेख केला आहे, ज्यात त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान मैत्रिणीसोबत घालवलेल्या वेळाबद्दल सांगितले आहे.

मैत्रिणीला हॉटेलच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रसंग

वर्ष २००६ साली भारत ‘A’ संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु असताना, शिखर धवनने एका मुलीबरोबरच्या आपल्या नात्याबाबत लिहिलं आहे. त्याने तिला पुस्तकात "अ‍ॅलन" असं नाव दिलं आहे. धवन लिहितो, “ती खूपच सुंदर होती आणि मी पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलो. मला वाटलं तीच माझ्यासाठी योग्य आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार!”धवनने तिला भेटण्यासाठी अनेकदा हॉटेलच्या खोलीत आणलं होतं. विशेष म्हणजे ही खोली त्याने रोहित शर्मासोबत शेअर केली होती. तो पुढे लिहितो, "मी अ‍ॅलनला खोलीत घेऊन जायचो. कधी कधी रोहित हिंदीत तक्रार करायचा, 'तू मला झोपू देशील का?'"

संघात पसरली बातमी

या नात्याची माहिती केवळ रोहितपुरती मर्यादित राहिली नाही. एका संध्याकाळी जेव्हा शिखर अ‍ॅलनसोबत जेवायला गेला होता, तेव्हा एक वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याने त्यांना लॉबीमध्ये हातात हात घालून चालताना पाहिले. धवन म्हणतो, “मला तेव्हा वाटलंही नाही की तिचा हात सोडावा, कारण मला वाटलं आम्ही काहीही चुकीचं करत नव्हतो.”पण त्याच प्रसंगानंतर, त्यांच्या नात्याची बातमी संपूर्ण संघात वाऱ्यासारखी पसरली. संघातील अनेक सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनला.

प्रेमामुळे घसरलेली कामगिरी

शिखर धवनने आपल्या आत्मचरित्रात हेही कबूल केलं आहे की त्या काळात अ‍ॅलनसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे त्याचे लक्ष भटकले गेले होते. “मी एका सराव सामन्यात अर्धशतक झळकावलं होतं, पण नंतर माझं लक्ष अ‍ॅलनकडे जास्त जात होतं आणि मैदानावरील कामगिरीत सतत घसरण होऊ लागली.” शिखरच्या मते, जर सातत्याने चांगली कामगिरी केली असती, तर त्याला वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळालं असतं. पण हे प्रेमप्रकरण त्याच्या कारकीर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अडथळा ठरलं.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.