बंगळुरूजवळ पहाटेच्या सुमारास एका भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अतिवेगात असलेली त्यांची मोटार एका दुचाकीला आणि नंतर टँकरला धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार कामगाराचाही दुर्दैवी अंत झाला.

बंगळुरू शहराच्या जवळ एक अपघात झाला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अतिवेगात असल्यामुळं गाडीचा अपघात झाल्याची माहिती समजली आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास मोटारीतून शहरातील महाविद्यालयातील सहा बारावीचे विद्यार्थी लॉन्ग ड्राइव्हला निघाले होते. नवीन महामार्गावर वेगात येत असताना त्यांनी एका दुचाकीला धडक दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

टँकरला मारली धडक 

गाडीने धडक मारल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटारीने दुभाजक ओलांडून पलीकडच्या टँकरला धडक दिली. त्यानंतर गाडीतील सर्व एअरबॅग्स उघडल्या मात्र अतिवेग आणि धडकेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले नाहीत. अपघातानंतर टँकर उलटला असून त्याची दोन चाके वेगळी झाली आहेत. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या मोटारीने गाडीला धडक दिली.

अपघातात गगनचा झाला मृत्यू 

या अपघातात गगन नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तो त्याच काम आवरून घरी चालला होता, जाताना त्याच्या गाडीला धडक बसल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याची आई दृष्टीहीन आहे. या ठिकाणचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचे मृतदेह बाजूला काढले.