हा Rapido Rider चक्क सॉफ्टवेअर इंजिनिअरपेक्षा जास्त कमवतो, चक्क 1 लाख रुपये महिना!
Rapido Driver Earns 1 Lakh Per Month : पैसे कमावणे जितके कठीण आहे, तितकेच सोपेही आहे, असे म्हटले जाते. मनात जिद्द असेल तर पैसे कमावणे मोठी गोष्ट नाही, असं एक रॅपिडो ड्रायव्हर सांगतोय. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे.

तीन नोकऱ्या...
दिवसभर स्विगी डिलिव्हरी, संध्याकाळी रॅपिडो राईड्स आणि विकेंडला पाणीपुरी स्टॉल. तीन कामं करणारा तरुण चर्चेत आहे. कॉपीरायटर कोमल पोरवाल यांनी या ड्रायव्हरचा अनुभव शेअर केला आहे. कोमल यांनी त्याच्याशी संवाद साधला आहे. त्याचा कष्टमय पण तेवढाच प्रेरणादायी प्रवास लोकांसोबत शेअर केला आहे.
मेहनत जास्त आहे, पण...
'काम कठीण आहे, पण घरात आनंद आहे,' असं तो तरुण म्हणतो. रात्री उशिरापर्यंत काम करूनही चेहऱ्यावर थकव्यापेक्षा समाधान जास्त दिसतं, असेही तो सांगतो. कोमलची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
महिन्याची कमाई ऐकून धक्का बसेल
एवढे कष्ट करुन तो महिन्याला किती कमावतो? असे कोमलने त्याला विचारले. फूड डिलिव्हरी, रॅपिडो आणि पाणीपुरी स्टॉलमधून तो महिन्याला ९५ हजार ते १ लाख रुपये कमावतो, असे त्याने सहज सांगितले. हे ऐकून कोमल थक्क झाल्या.
तरुण पिढी काम करत नाही?
आजची तरुण पिढी मेहनत करत नाही, या विचाराला हा तरुण अपवाद आहे. कोमलने आपल्या पोस्टमध्ये हाच मुद्दा मांडला आहे. त्याची ही प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
केवळ कमाई नाही, तर...
ही कथा केवळ कमाईची नाही, तर समर्पण, कष्ट आणि धैर्याची आहे. नेटीझन्स त्याच्या जिद्दीचे कौतुक करत आहेत. 'आनंदाने काम करणारेच जिंकतात,' अशा प्रतिक्रिया देत आहेत.

