Ram Mandir : मूर्तिकार योगीराज अरुण यांनी साकारलेली रामललांची मूर्ती मंदिरात स्थापन करणार, प्रल्हाद जोशी यांची माहिती

| Published : Jan 02 2024, 09:56 AM IST / Updated: Jan 12 2024, 01:33 PM IST

Ram Mandir
Ram Mandir : मूर्तिकार योगीराज अरुण यांनी साकारलेली रामललांची मूर्ती मंदिरात स्थापन करणार, प्रल्हाद जोशी यांची माहिती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अयोध्येतील रामलालांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता मंदिराच्या गाभाऱ्यातील रामललांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत दिली आहे. 

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या गाभाऱ्यातील रामललांच्या मूर्तीची अखेर निवड करण्यात आली आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामललांची ही मूर्ती कर्नाटकातील विशेष निळ्या रंगाच्या दगडापासून तयार करण्यात आली आहे.

 खरंतर गाभाऱ्यात स्थापन करण्यात येणाऱ्या मूर्तीची निवड श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टद्वारे करण्यात आली. मुर्तिकार योगीराज अरुण (Yogiraj Arun) यांनी साकारलेल्या रामललांच्या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी दिली आहे. 

रामललांची बाल रूपातील मूर्ती
गाभाऱ्यात जी मूर्ती स्थापन केली जाणार आहे ती रामललांच्या बाल रूपातील असणार आहे. पाच वर्षांच्या रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामललांची मूर्ती कर्नाटकातील विशेष निळ्या रंगाच्या दगडापासून तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती मूर्तिकार योगीराज अरुण यांनी साकारली आहे. 

कोण आहेत अरुण योगीराज?
रामललांची मूर्ती तयार करणारे मूर्तिकार योगीराज अरुण म्हैसूर पॅलेसच्या कलाकारांच्या परिवारातील आहेत. 37 वर्षीय योगीराज अरुण यांनी वर्ष 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर योगीराज एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. पण नोकरी सोडून त्यांनी मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगीराज अरुण यांनी तयार केलेल्या रामललांच्या मूर्तीचे कौतुकही केले आहे. जगद्गुरू शंकराचार्य यांच्या भव्य मूर्तीची निर्मिती देखील योगीराज यांनी केली आहे. ही मूर्ती केदारनाथ धाम येथे स्थापन करण्यात आली आहे.

अरुण योगीराज यांच्या आईची प्रतिक्रिया
रिपोर्ट्सनुसार, योगीराज अरुण यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड करण्यात आल्याने त्यांची आई सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरस्वती यांनी म्हटले की, हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मला अरुणला मूर्ती साकारताना पाहायचे होते. पण त्याने मी तुला शेवटच्या दिवशी घेऊन जाईन असे म्हटले. यामुळे स्थापनेच्या दिवशी मी जाणार आहे."

रामललांची प्राणप्रतिष्ठा
येत्या 22 जानेवारीला रामलालांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्हीव्हीआयपी देखील उपस्थितीत राहणार आहेत. राम मंदिर सोहळ्याचा कार्यक्रम सात दिवस सुरू राहणार आहे. याची सुरूवात 16 जानेवारीपासून होणार आहे.

आणखी वाचा: 

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कधीपर्यंत होणार पूर्ण? जाणून घ्या UPDATES

Ram Mandir : रामललांच्या दर्शनासाठी मुंबईत ते अयोध्यापर्यंत शबनमचा पायी प्रवास, कोण आहे ही तरूणी?

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त या कारणास्तव आहे खास

 

Read more Articles on