सार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी मध्य प्रदेशात भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपचे राज्यसभेतील खासदार अजय प्रताप सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना देखील दिली आहे.

Ajay Pratap Singh Resigns :  देशात आज (16 मार्च) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. याआधी मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. राज्यसभेचे खासदार अजय प्रताप सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. असे मानले जात आहे की, अजय प्रताप सिंह यांना लोकसभेचे तिकिट न दिल्याने नाराज होते. अजय प्रताप सिंह यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि प्रदेशाचे अध्यक्ष वीडी शर्मा (VD Sharma) यांच्याकडे दिला आहे.

भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर 
भाजपकडून मध्य प्रदेशातील 29 लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पक्षाने मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सीधी (Sidhi) जागेवरुन राजेश मिश्रा, छिंदवाडा जागेवरुन विवेक 'बंटी' साहू, बालाघाट येथून भारती पारधी, उज्जैन जागेवरुन अनिल फिरोजिया, धार येथून सावित्री ठाकुर आणि इंदौर येथून शंकर लालवानी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. पक्षाला रामराम ठोकलेल्या अजय प्रताप सिंह यांना सीधी येथून निवडणूक लढायची होती. आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, अजय प्रताप सिंह अपक्ष उमेदवाराच्या रुपात निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

दरम्यान, विवेक 'बंटी' साहू छिंदवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार नकुलनाथ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बंटीला छिंदवाडा येथून पुन्हा तिकिट देण्यात आले आहे. याशिवाय इंदौर येथून शंकर लालवानी आणि उज्जैन येथून अनिल फिरोजिया यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्वास दर्शवला आहे. बालाघाट येथून भारती पारधी यांना पहिल्यांदा तिकिट देण्यात आले आहे. धार येथून सावित्री ठाकुर यांना दुसऱ्यांदा तिकिट दिले आहे.

आणखी वाचा : 

Loksabha Election : देशातील पक्ष कोणत्या चेहऱ्यांना घेऊन निवडणूक लढवणार, या निवडणुकीत कोणते मुद्दे पुढे येणार?

'भाजप द्रमुक-काँग्रेस युतीचा अहंकार मोडून काढेल', पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील विरोधकांवर केली टीका

Jal Jeevan Mission - नळाचे पाणी देशातील 75% घरांपर्यंत पोहोचले, महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हंडा घ्यावा लागणार नाही