Rajya Sabha Elections 2024 : 15 राज्यातील 56 जागांवर येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार, पाहा महाराष्ट्रात किती जागा

| Published : Jan 29 2024, 03:56 PM IST / Updated: Jan 29 2024, 04:05 PM IST

voting

सार

भारतीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी (29 जानेवारी) 15 राज्यांच्या 56 राज्यसभेच्या जागांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे.

Rajya Sabha Elections 2024 :  भारतीय निवडणूक आयोगाकडून आज (29 जानेवारी) 15 राज्यांमधील 56 राज्यसभेच्या जागांवर मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या निवडणूका होणार असल्याची घोषणा केली आहे.

27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूक
27 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेसाठी मतदान केल्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी देखील केली जाणार आहे. दरम्यान, 13 राज्यांच्या 50 राज्यसभेच्या जागांवरील कार्यकाळ 2 एप्रिलला पूर्ण होत आहे. याशिवाय अन्य दोन राज्यांमधील 6 राज्यसभेच्या जागांवरील कार्यकाळ 4 एप्रिलला पूर्ण होणार आहे. यामुळेच राज्यसभेच्या सर्व 56 जागांवर एकाच दिवशी निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

15 राज्यांमध्ये 56 राज्यसभेच्या जागा

  • उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार
  • बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी सहा-सहा जागांसाठी निवडणूक होणार
  • मध्य प्रदेश, पश्चिम बंगालध्ये प्रत्येकी पाच-पाच जागांसाठी निवडणूक होणार
  • गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी 4-4 जागांसाठी निवडणूक होणार
  • ओडिशा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन-तीन जागांसाठी निवडणूक होणार

27 फेब्रुवारीलाच मतमोजणी
राज्यसभेच्या 56 जागांवर 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूकीसाठी 8 फेब्रुवारीला अधिसूचना जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्जासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ असणार आहे. याशिवाय उमेदवार अर्जाची पडताळणी 16 फेब्रुवारीला होणार असून 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात.

आणखी वाचा : 

Pariksha Pe Charcha 2024 : 'प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास तयार राहा', वाचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले..

दूध विक्री करणाऱ्याची मुलगी बनली IAS, शिक्षणाची फी भरण्यासाठीही नव्हते पैसे

Delhi Politics : अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर मोठा आरोप, AAPच्या आमदारांना 25 कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा दावा