SHOCKING NEWS: संपूर्ण कुटुंबासाठी जीवघेणी ठरली कार, मुलगा-सूनेसह चिमुकल्यांचा मृत्यू

| Published : Apr 15 2024, 11:11 AM IST / Updated: Apr 15 2024, 02:12 PM IST

Rajasthan Road Accident

सार

Rajasthan Accident : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील चुरू सालासर राज्य महामार्गावर भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कारची धडक ट्रकला बसल्यानंतर स्फोट झाला. यामुळे कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

Rajasthan Road Accident : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात चुरू सालासर राज्य महामार्गावर रविवारी (14 एप्रिल) भीषण अपघात घडला. या दुर्घनेत वेगाने येणारी कारची ट्रकला धडक बसली. यामुळे कार पेटल्याने त्यामधील संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सर्वजण राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील सालासर बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

नक्की काय घडले?
रिपोर्ट्सनुसार, दुर्घटनेत कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. यामुळे कारने पेट घेतली. अपघतात कार पेटल्याने सात जणांचा मृत्यू झाला. सदर घटना रविवारी दुपारच्या वेळेस घडल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सीकर येथील फतेहपुरच्या शेखावटी जवळ अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कारला आग लागल्याने आतमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर पडता आले नाही. यामुळे कुटुंबातील सर्वांचा आगीत जळून मृत्यू झाला.

सात जणांपैकी दोन लहान मुलींचा मृत्यू
कारने पेट घेतल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन लहान मुलींचा देखील समावेश आहे. संपूर्ण कुटुंब उत्तर प्रदेशात राहणारा होता. खरंतर, कारचा वेग अधिक असल्याने त्याची धडक ट्रकला बसली गेली. यामुळेच अपघात घडत कारमधील गॅस किटचा स्फोट झाला.

कार ओव्हरटेक केल्याने घडला अपघात 
प्रत्यक्षदर्शींनुसार, महामार्ग कार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने अपघात घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या मोबाइल फोनवर एक फोन आला. यानंतर घटनास्थळावरील एकाने फोन उचलला असता फोनवरील व्यक्ती मेरठमधील असल्याचे सांगितले. फोनवरील व्यक्तीने अपघतातील व्यक्तीची आई बोलत असल्याचे सांगितले. यामुळेच अपघातातील मृतांची ओखळ पटली. मृत व्यक्ती मेरठमधील शारदा रोड येथील स्थानिक असल्याचे समोर आले.

आणखी वाचा : 

7 मिनिटांत 7 मृत्यू, हृदय पिळवटून टाकतील राजस्थानमधील घटनेचे 7 फोटोज

सरबजीतच्या मारेकऱ्याची लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीने केली गोळ्या घालून हत्या