MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Rahul Gandhi Protest : पुन्हा एकदा हादरली देशाची राजधानी, दिल्लीत नेमकं चाललंय तरी काय?

Rahul Gandhi Protest : पुन्हा एकदा हादरली देशाची राजधानी, दिल्लीत नेमकं चाललंय तरी काय?

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनामुळे राजधानीत प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 06 2026, 03:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत रॅली
Image Credit : Rahul Gandhi/X

संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत रॅली

मंगळवारी सकाळी 'इंडिया' आघाडीचे खासदार आणि कार्यकर्त्यांनी संसद परिसरातील मकर द्वारापासून रॅलीला सुरुवात केली. मतदार यादी सुधारणा प्रक्रियेवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, त्याविरोधात हे आंदोलन पुकारले आहे. ज्ञानेश कुमार यांनी पदावरून पायउतार व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी मागणी करत नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांनी मोठे बॅरिकेड्स लावून ही रॅली पुढे जाण्यापासून रोखली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
राहुल गांधी बॅरिकेड्सवर चढले, अनेक नेते ताब्यात
Image Credit : Rahul Gandhi/X

राहुल गांधी बॅरिकेड्सवर चढले, अनेक नेते ताब्यात

पोलिसांनी रॅली अडवल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक नेते रस्त्यावरच ठिय्या देऊन बसले. यानंतर राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले आणि हातात तिरंगा घेऊन त्यांनी निषेध नोंदवला. परिस्थिती अधिकच चिघळल्याने पोलिसांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना बसमधून नेण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्त्यांनी वाहन अडवले. त्यामुळे थोड्या अंतरावर गेल्यानंतर पोलिसांनी नेत्यांना बसमधून खाली उतरवले.

Gyanesh, it’s done, bro.

Time to resign.

#IndiaAllianceMarch https://t.co/9ZB6aJfakl

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2026

Related Articles

Related image1
Now Playing
CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park
35
'ज्ञानेश.. आता बास झालं', राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया
Image Credit : Rahul Gandhi/X

'ज्ञानेश.. आता बास झालं', राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनी या आंदोलनाचा एक व्हिडिओ 'एक्स' (X) वर शेअर केला आहे. 'ज्ञानेश.. आता बास झालं भावा.. राजीनामा देण्याची वेळ आली आहे,' अशा शब्दांत त्यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि आम आदमी पक्ष (AAP) या आंदोलनापासून दूर राहिले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार (NCP-SP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर नेते या रॅलीत सहभागी झाले होते.

45
मतदार यादीवरून विरोधकांचे गंभीर आरोप
Image Credit : Rahul Gandhi/X

मतदार यादीवरून विरोधकांचे गंभीर आरोप

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकार लोकांचे लोकशाही अधिकार टप्प्याटप्प्याने कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वातंत्र्यानंतर देशातील जनतेने लढून मिळवलेल्या सार्वत्रिक प्रौढ मताधिकारालाही आता धोका निर्माण झाला आहे, असे खर्गे म्हणाले. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम न करता केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

LIVE: Protest March Against Vote Chori | Parliament House to EC Office, New Delhi https://t.co/9sCG7G7R1A

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2026

55
SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
Image Credit : Rahul Gandhi/X

SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रियेअंतर्गत मोठ्या संख्येने मते वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदार धरमवीर गांधी यांनी केला. सुमारे १३ कोटी मते वगळणे हा देशातील सर्वात मोठा निवडणूक घोटाळा असल्याचे ते म्हणाले. लोकशाही आणि घटनात्मक संस्थांचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. SIR प्रक्रिया थांबवावी आणि वगळलेल्या मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rahul Gandhi: राहुल गांधींनी महिला पोलिसाला धक्का दिला? व्हिडिओ शेअर करत भाजपचा गंभीर आरोप
Recommended image2
PM Modi: 'इंडियन ड्रीम'चे उत्तम उदाहरण! आंतरराष्ट्रीय गायिका मेरी मिलबेन यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक
Recommended image3
INDIA Bloc Protest: जंतरमंतरवर पोलिसांना मारहाण, दिल्ली पोलीस FIR दाखल करणार
Recommended image4
Rahul Gandhi Protest: लोकांचा आवाज दाबता येणार नाही, राहुल गांधींचा इशारा
Recommended image5
Delhi Protest: 'माझ्या शरीराला हात लावू नकोस', महिला पोलिसावर आंदोलकाचा गंभीर आरोप, पाहा Video
Related Stories
Recommended image1
Now Playing
CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved