सार
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भगवान पवार प्रकरणावर चुप्पी साधली असून त्यांनी मीडिया प्रतिनिधीला युद्धात वागणूक दिली आहे. यामुळे तानाजी सावंत आणि भगवान पवार यांच्यात काही गौडबंगाल तर नव्हते ना, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्राचे राजकारण वेगळीच दिशेला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कधी आणि काय होईल हे सांगता येत नाही. पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तानाजी सावंत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी पत्रकाराशी उद्धटपणे संवाद साधल्याचे दिसून आले आहे.
नेमकं प्रकरण काय आहे? -
डॉ. भगवान पवार यांनी आरोग्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यांनी या आरोपात म्हटले आहे की, मंत्र्यांनी मला कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडर, खरेदी प्रक्रिया आणि अन्य कामांमध्ये दबाव आणला होता. पण मी त्यांना नियमबाह्य कामांमध्ये मदत केली नाही म्हणून माझे निलंबन करण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता.
यावर डॉ. तानाजी सावंत यांनी काय दिली प्रतिक्रिया -
यावर डॉ. तानाजी सावंत यांच्याशी मीडिया प्रतिनिधीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी अतिशय उद्धटपध्दतीने त्याला वागणूक दिली. तो प्रतिनिधी सावंत यांच्या मागे जात असताना त्यांनी याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तो दिला नसल्यामुळे पुढे जाऊन सावंत हे लिफ्टमध्ये गेले आणि तेथे पत्रकाराने जायचा प्रयत्न केला असताना त्याला थांबवण्यात आले. त्यानंतर त्या पत्रकाराला सरळ लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले आणि तानाजी सावंत यांनी या घटनेवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसल्याचे दिसून आले आहे.
आणखी वाचा -
इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनंतर प्रवाशांना कसे काढले विमानाबाहेर? काही प्रवासी तर उडी मारून...
रिलायन्स कंपनीचा IPO आणणार मुकेश अंबानी, भविष्यात पुढे जाऊन असा आहे प्लॅन की...