MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • President Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू हे नाव कोणी दिले? जाणून घ्या राष्ट्रपतींचा प्रेरणादायी प्रवास

President Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू हे नाव कोणी दिले? जाणून घ्या राष्ट्रपतींचा प्रेरणादायी प्रवास

President Droupadi Murmu : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान राष्ट्रपतींनी आपल्या जीवनातील कित्येक खास-महत्त्वपूर्ण क्षणांबाबत दिलखुलासपणे चर्चा केली. 

3 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Feb 14 2024, 08:41 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : President Droupadi Murmu X

President Droupadi Murmu : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत (President Droupadi Murmu Interview) घेतली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून राष्ट्रपती मुर्मू यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी देशवासीयांसमोर आली आहे. यावेळेस राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या नावाशी संबंधित असलेला किस्सा देखील सांगितला.

प्रश्न 1 - द्रौपदी मुर्मू हे नाव तुमच्या शिक्षकांनी दिले आहे, असे मी ऐकले. ते खरे आहे का?

द्रौपदी मुर्मू : खरे आहे. कारण आमच्या समाजामध्ये कुटुंबात पहिल्यांदा मुलगी जन्माला आल्यास तिला आजीचे नाव दिले जाते. मुलगा जन्मल्यास त्याला आजोबांचे नाव दिले जाते. नाव अजरामर व्हावे, अशी यामागील भावना आहे. त्यानुसार ‘दुर्गी’ हे माझ्या आजीचे नाव मला मिळाले. पण माझ्या शिक्षकांना हे नाव आवडले नाही. तर त्यांनी मला ‘द्रौपदी’ हे नाव दिले.

26
Image Credit : President Droupadi Murmu X

प्रश्न 2 - इयत्ता पाचवीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या गावातील पहिल्या मुलीने राष्ट्रपती होण्याचे स्वप्न होते का?

द्रौपदी मुर्मू : मी एक सामान्य मुलगी होते. तास-न्-तास तलावामध्ये पोहत असे. मी कधीही असे स्वप्न पाहिले नव्हते की मला राष्ट्रपती व्हायचे आहे.

36
Image Credit : President Droupadi Murmu X

प्रश्न 3 - देशातील नागरिकांनी आपल्याला नुकतेच मेट्रोतून प्रवास करताना पाहिले. राष्ट्रपती म्हणून हा अनुभव कसा होता?

द्रौपदी मुर्मू : सामान्य नागरिकांप्रमाणे अनुभव घेण्याचा मी देखील विचार केला. हजारो लोक मेट्रोने प्रवास करतात. आपल्या ऑफिस तसेच कामाच्या ठिकाणी जातात. मेट्रोची रचना कशी करण्यात आली आहे, हे मला देखील पाहायचे होते.

46
Image Credit : President Droupadi Murmu X

प्रश्न 4 - वर्ष 1997मध्ये आपण नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस घरातील वातावरण कसे होते?

द्रोपदी मुर्मू : सुरुवातीस मी तयार नव्हते, कारण मुले लहान होती. पण नंतर मी विचार केला. राजकारणाकडे थोडासा कल होताच, पण त्या काळात महिला राजकारणामध्ये फारशा येत नसे. माझ्या पतीने मला निवडणूक लढवण्यास सांगितले. यानंतर मी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला.

56
Image Credit : President Droupadi Murmu X

प्रश्न 5 - राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून तुमच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती आपणास सर्वप्रथम समजली. तेव्हा तुम्ही फोनचे उत्तर देत नव्हतात, असे मी ऐकले. ‘फोन उचला, तुमच्या उमेदवारीसंदर्भात घोषणा होत आहे’, हा संदेश देण्यासाठी कोणीतरी सायकल चालवून तुमच्यापर्यंत आले होते.

द्रौपदी मुर्मू : बरोबर आहे. माझा फोन कधी-कधी संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने लागत नाही. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनचे मी उत्तर देत नाही. राज्यपाल म्हणून कार्यरत असताना एक पी.एस. होते, ते एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होते. त्यांचा फोन आला. दिल्लीहून फोन येत असल्याची माहिती त्यांनी मला दिली. तुम्ही फोनचे उत्तर देत नसल्याने मी धावत-धावत आलो आहे. त्यांचे हात पाय थरथरत होते. पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांना माझ्याशी का बोलायचे आहे, याचे मला आश्चर्य वाटू लागले. मग त्यांनी आलेल्या क्रमांकावरच फोन लावला. समोरून मला पंतप्रधानांचा (PM Narendra Modi) आवाज ऐकू आला. ते म्हणाले की, आम्हाला तुम्हाला राष्ट्रपती करायचे आहे. मी याचा कधीही विचार केला नव्हता. माझे हातपाय पूर्णपणे सुन्न पडले होते. यावर मी काही बोलूही शकले नव्हते.

66
Image Credit : President Droupadi Murmu X

संपूर्ण मुलाखत येथे पाहा

आणखी वाचा :

'PM मोदी पंजाबमध्ये पुन्हा आल्यास गंभीर परिणाम होतील', आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची धमकी Watch Viral Video

BIG UPDATE : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात मोठी वाढ, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 10 महत्त्वाचे निर्णय

Khandoba Temple : खंडोबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
सीमापार पुन्हा कट? जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी ड्रोनच्या घुसखोरीनंतर LoC वर हाय अलर्ट
Recommended image2
Maruti Suzuki चा गुजरातमध्ये गेमचेंजर प्लान, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 4960 कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी
Recommended image3
इस्रोला मोठा धक्का : इतिहासात पहिल्यांदाच सलग दुसरे अपयश, PSLV रॉकेट प्रक्षेपण पुन्हा अयशस्वी
Recommended image4
NEET UG 2026 : अंतिम अभ्यासक्रम वेबसाईटवर जाहीर, NTA ने दिली माहिती
Recommended image5
Face authentication: UPSC परीक्षेत आता डमी उमेदवाराची केवळ 10 सेकंदात ओळख पटणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved