Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला किती जागांवर मिळणार विजय? प्रशांत किशोर यांनी केली भविष्यवाणी

| Published : Feb 24 2024, 01:25 PM IST / Updated: Mar 21 2024, 05:52 PM IST

prashant kishor on 2024 election
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला किती जागांवर मिळणार विजय? प्रशांत किशोर यांनी केली भविष्यवाणी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

राजकीय रणनितीकार प्रशांत प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला निवडणुकीत किती जागांवर विजय मिळवता येईल याबद्दल अंदाज बांधले आहेत.

Lok Sabha Election 2024 : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. यासंदर्भात प्रशांत किशोर यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 100 जागांवर विजय मिळवणे फार मुश्किल आहे. खरंतर प्रशांत किशोर यांनी हे विधान एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. याशिवाय निवडणुकीत भाजप पक्ष 370 चा आकडा गाठण्याची शक्यता कमी आहे. पण पश्चिम बंगालमध्ये भाजप उत्तम प्रदर्शन करेल असेही प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 100 चा आकडा पार करणार का असे विचारले असता त्यांनी म्हटले की, "पक्षातील सध्या जागांच्या आकडेवारीत फार मोठा बदल होईल असे दिसून येत नाहीय. पण जागांची आकडेवारी 50-50 झाली तरीही देशातील राजकरण बदलले जाणार नाही. मला काँग्रेसबद्दल निवडणुकीचे निकाल सकारात्मक असतील असे वाटत नाही. मोठ्या बदलावासाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. खरंतर आजच्या तारखेत असे करणे मुश्किल आहे."

निवडणुकीत भाजप 350 चा आकडा पार करणार?
निवडणुकीत भाजप 350 चा आकडा पार करणार का असा प्रश्न विचारला असता प्रशांत किशोर यांनी म्हटले की, "भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. खरंतर, नागरिकांनी या 370 च्या लक्ष्यला खरं मानू नये. प्रत्येक नेत्याला आपले लक्ष्य ठरवण्याचा अधिकार आहे. जर 370 चा आकडा पार करता आल्यास उत्तमच आहे. पण असे झाले नाही तर पक्षाला आपली चूक स्विकार करावी लागेल."

प्रशांत किशोर यांच्या मते, वर्ष 2014 नंतर आठ-नऊ अशा निवडणुका झाल्या आहेत जेथे भाजपने आपले लक्ष्य गाठता आले नाही. मला असे वाटते भाजप एकट्याने 370 चा आकडा पार करू शकत नाही. याची शक्यता जवळजवळ शून्यच आहे. पण 370 चा आकडा पार करता आल्यास तर आश्चर्याची गोष्ट आहे असे म्हणावे लागले. किशोर यांच्यानुसार, जर संदेशखळीसारखी घटना झाल्यास निश्चित रुपात ते सत्तारुढ पक्षासआठी नुकसानीचे कारण ठरू शकते.

दरम्यान, भाजपला 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या जागांच्या विजयापेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या.

आणखी वाचा : 

Sudarshan Setu : नरेंद्र मोदी द्वारका येथील सुदर्शन पुलाचे उद्घाटन करणार, पूल बांधण्यासाठी आला 980 कोटींचा खर्च

PM Modi Varanasi Visit : पंतप्रधान मोदींमुळे महिलांची गुंडगिरी वाढली का? पंतप्रधान व काशीतील महिलांमधील संवादाचा मजेदार व्हिडीओ पाहा

Sandeshkhali Case : ममता बॅनर्जी संदेशखळीतील कोणते सत्य लपवण्याचा करताहेत प्रयत्न? BJPने जारी केली डॉक्युमेंट्री

 

Read more Articles on