सार
गरीब आणि मजूरांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी मोदी सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. खरंतर, या योजनेचा शुभारंभ वर्ष 2020 मध्येच झाला होता. आता या योजनेत 29 कोटींहून अधिक जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
E- Shram Card : तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असल्यास तुम्हाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. या योजनेत विम्यासह अन्य काही शासकीय योजनांचा एकत्रित लाभ घेता येतो. खरंतर, असंघटित क्षेत्रात (Unorganized Sector) काम करणाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी वर्ष 2020 मध्ये मोदी सरकारने ई-श्रम योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत देशात 29,41,32,933 ई-श्रम कार्ड तयार करण्यात आले आहेत. अशातच जाणून घेऊया ई-श्रम कार्डचे फायदे काय आहेत याबद्दल सविस्तर....
ई-श्रम कार्ड कोण तयार करू शकते?
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती ज्यांचे वय 16 ते 59 वर्ष आहे ते ई-श्रम कार्ड तयार करू शकतात. खरंतर, दुकानात काम करणारे कर्मचारी, हेल्पर, सेल्समन, ड्रायव्हर, पशूपालन करणाऱ्या व्यक्ती, डेअरी चालवणारा, पंक्चरवाला, पेपर विक्रेता, झोमॅटो, स्विगी किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विटांच्या भट्टीत काम करणारे मजूरही ई-श्रम कार्ड तयार करू शकतात.
फायदे काय?
- ई-श्रम पोर्टलवर एखाद्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याला दोन लाख रुपयांचा एक्सीडेंट विमा कव्हर मिळते.
- पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेला लाभ मिळतो.
- स्वयंरोजगार करणाऱ्यांना राष्ट्रीय पेंन्शन योजना आणि अटल पेंन्शन योजनेचा लाभ मिळतो.
- पंतप्रधान जीवन ज्योति विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान आवास योजनेचाही लाभ मिळतो.
- राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता योजना आणि आयुष्मान भारतचा लाभ मिळतो.
- पंतप्रदान कौशल विकास योजना आणि पंतप्रधान रोजगार सृजन योजनेचाही लाभ मिळतो.
ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते
- आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक असणे
ई- श्रम पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
- ई-श्रम पोर्टलचे अधिकृत संकेतस्थळ eshram.gov.in येथे जाऊन रजिस्टर ऑन ई-श्रम ऑप्शनवर क्लिक करा.
- नवे पेज सुरू झाल्यानंतर तुमची काही माहिती मागितली जाईल.
- आता आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल त द्या.
- रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू होईल तो भरा आणि मागितलेले कागदपत्र द्या.
- फॉर्म सबमिट करण्याआधी तो व्यवस्थितीत वाचा.
- यानंतर तुम्हाला 10 अंकी असलेले ई-श्रम कार्ड मिळेल.
आणखी वाचा :