सार
इस्रोच्या गगनयान मोहीमेसाठी अंतराळवीरांच्या नावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केली जाणार आहे.
Gaganyaan Mission : भारताकडून अंतराळात व्यक्तीला पाठवण्याची तयारी केली जात आहे. अशातच इस्रोकडून (ISRO) गगनयान मोहीमेच्या माध्यमातून अंतराळात अंतराळवीरांना पाठवले जाणार आहे. याबद्दलची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वर्ष 2018 मध्ये केली होती. यानंतर अशी चर्चा सुरू झाली होती की, कोणत्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवले जाणार आहे. आज (27 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजीत कृष्णन आणि चौहान यांना अंतराळात पाठवण्यासाठी निवडण्यात आले आहे. हे सर्वजण भारतीय वायू सैन्यातील विंग कमांडर किंवा ग्रुप कॅप्टनमधील आहेत. या सर्वांना बंगळुरु येथील एस्ट्रोनॉट ट्रेनिंग केंद्रात ट्रेनिंग देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुवनंतपुरम येथील इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट देणार आहेत. या ठिकाणी एका कार्यक्रमात चारही अंतराळवीरांची ओळख जगाला करून देणार आहेत.
रशियाला पाठवून देण्यात आलीय अंतराळवीरांनी ट्रेनिंग
अंतराळवीरांची निवड वायू सैन्यातील टेस्ट पायलटांमधून करण्यात आली आहेत. अंतरळवीर होण्यासाठी बहुतांश जणांनी अर्ज केले होते. याआधी 12 जणांची एक यादी तयार करण्यात आली होती. त्यापैकी चार जणांची निवड करण्यात आली आहे. अंतराळवीरांची निवड इंस्टीट्युट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन (IAM) यांच्याकडून करण्यात आली आहे. चारही अंतराळवीरांना वर्ष 2020 च्या सुरुवातीला ट्रेनिंगसाठी रशियात पाठवण्यात आले होते.
गगनयान मोहीम नक्की काय आहे?
गगनयान मोहीम इस्रोची पहिली अशी मोहीम आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अंतराळात पाठवले जाणार आहे. अंतराळवीरांना 400 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या अंतराळाच्या कक्षेत पाठवले जाणार आहे. अंतराळवीर तीन दिवस अंतराळात राहणार असून त्यानंतर जमिनीवर परतणार आहेत. अंतराळ यानाचे लँडिंग समुद्रात केले जाणार आहे. यासाठी इस्रोकडून व्यक्तीला अंतराळ पाठवण्यासाठी सक्षम असणारे रॉकेट, लाइफ सपोर्ट सिस्टिमसह अन्य खास तयारी केली जात आहे. याआधी अंतराळात व्यक्तीला पाठवण्याची मोहीम अमेरिका, रशिया आणि चीनने यशस्वीपणे पार पाडली आहे.
आणखी वाचा :
Bangalore Metro : बंगळुरू मेट्रो फक्त VIP लोकांसाठी आहे का? शेतकऱ्याचे घाणेरडे कपडे पाहून No Entry
'फक्त माझ्या मनालाच माहिती', कोणत्या कारणासाठी दिल्लीचे CM केजरीवालांना हवाय नोबेल पुरस्कार?