सार

PM Modi Jammu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारी रोजी जम्मूमध्ये एम्स जम्मूचे उद्घाटन करणार आहेत, या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती.

PM Modi Jammu Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी (20 फेब्रुवारी) जम्मूच्या दौऱ्यावर असणार आहेत.  मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जम्मूतील मौलाना आझाद स्टेडिअममध्ये PM मोदी ‘विकसित भारत विकसित जम्मू’ कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. यादरम्यान ते 30,500 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. 

या प्रकल्पांमध्ये आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, पेट्रोलियम, नागरी पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरमधील सुमारे दीड हजार नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देखील वितरित करणार आहेत. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशीही ते संवाद साधतील.

या शिक्षण संस्थांचेही होणार उद्घाटन

देशभरामध्ये शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी PM मोदी IIT जम्मू, IIM जम्मू, IIT भिलाई, IIT तिरुपती, IITDM कांचीपुरम, IIM बोधगया, IIM विशाखापट्टणम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) कानपूर यासारख्या अनेक महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचेही उद्घाटन करणार आहेत. तसेच देशभरातील केंद्रीय विद्यालयाच्या (KV) 20 नवीन इमारती आणि 13 नवीन नवोदय विद्यालय (NV) इमारतींचेही उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते एम्स जम्मूचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्या हस्ते एम्स जम्मूचे (AIIMS Jammu) मंगळवारी उद्घाटन करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची पायाभरणी PM मोदी यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. 1660 कोटी रुपये खर्च करून उभारलेले आणि 227 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या हॉस्पिटलमध्ये 720 खाटा, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, 30 खाटांसह आयुष ब्लॉक सुविधा (AYUSH Block Facilities) उपलब्ध आहेत. 

AIIMSमध्ये अत्याधुनिक हृदयरोग, गॅस्ट्रोसह 18 विशेष आणि 17 उच्च दर्जाच्या सेवा रुग्णांना प्रदान केल्या जाणार आहेत. 

या हॉस्पिटलमध्ये एंट्रोलॉजी (Enterology), नेफ्रोलॉजी (Nephrology), युरोलॉजी (Urology), न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, बर्न्स आणि प्लास्टिक सर्जरीच्या सुविधाही उपलब्ध आहेत. संस्थेमध्ये अतिदक्षता विभाग, आपत्कालीन आणि ट्रॉमा युनिट, 20 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (Modular Operation Theatres), रक्तपेढी (Blood Bank), फार्मसी अन्य सोयीसुविधाही आहेत. दुर्गम भागामध्ये पोहोचण्यासाठी डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांचीही तरतूद केली जाणार आहे.

यादरम्यान जम्मू विमानतळाची (Jammu Airport) नवीन टर्मिनल इमारत आणि जम्मूतील पेट्रोलियम डेपोची पायाभरणी देखील PM मोदींच्या हस्ते केली जाईल.

आणखी वाचा

Kamal Nath : कमलनाथ BJPमध्ये प्रवेश करून काँग्रेसचा हात सोडणार? मुलाने दिले संकेत

भारतीयांशी लग्न करणाऱ्या NRIसाठी कठोर नियम, या कारणासाठी विधि आयोगाने उचलले मोठे पाऊल

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल CM शिंदेंकडे सुपूर्द, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन