Kamal Nath : कमलनाथ BJPमध्ये प्रवेश करून काँग्रेसचा हात सोडणार? मुलाने दिले संकेत

| Published : Feb 17 2024, 06:11 PM IST / Updated: Feb 17 2024, 06:18 PM IST

Kamal Nath

सार

Kamal Nath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, त्यांचा मुलगा नकुल नाथ आणि काही काँग्रेसचे काही नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

Kamal Nath : लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) पूर्वी काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आपला मुलगा आणि काही समर्थक नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

कमलनाथ (Kamal Nath) यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार नकुल नाथ (Nakul Nath) यांनीही याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर देखील काँग्रेस पक्षाचा उल्लेख दिसत नाहीय. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सोनकच्छ येथील काँग्रेस आमदार सज्जन सिंह वर्मा (Congress MLA Sajjan Singh Verma) यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलमधून काँग्रेस पक्षाचा लोगो हटवला आहे. वर्मा हे कमलनाथ यांचे समर्थक मानले जातात.

...तर तसे मी सांगेन : कमलनाथ

भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर कमलनाथ (Kamal Nath) म्हणाले की, "जर असे काही होणार असेल तर मी तुम्हाला सर्वात आधी माहिती देईन."

तुम्ही ही बाब नाकारत नाहीय, असे म्हटल्यानंतर कमलनाथ यावर म्हणाले, "ही नाकारण्याची गोष्ट नाही. तुम्ही लोक हे बोलत आहात. तुम्ही लोक उत्साहित होत आहात. मी तर उत्साहित नाही, या बाजूला अथवा त्या बाजूला. जर असे काही घडले तर सर्वात आधी तुम्हालाच सांगेन".

कमलनाथ काँग्रेस सोडू शकत नाहीत - दिग्विजय सिंह

कमलनाथ आणि नकुल नाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चर्चांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, शुक्रवारी रात्री कमलनाथ यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, “नेहरू-गांधी घराण्यापासून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली, त्या व्यक्तीकडून पक्ष सोडून जाण्याची अपेक्षा आम्ही कशी करू शकतो? अशी अपेक्षा देखील केली जाऊ नये”.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपकडून त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. नुकतेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) आणि मिलिंद देवरा (Milind Deora) यांनीही काँग्रेस पक्ष सोडला. सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. तर देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटामध्ये प्रवेश केला आहे.

आणखी वाचा

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट! 9 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Suhani Bhatnagar : 'दंगल' फेम सुहानी भटनागरचे निधन, वयाच्या 19व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीयांशी लग्न करणाऱ्या NRIसाठी कठोर नियम, या कारणासाठी विधि आयोगाने उचलले मोठे पाऊल