सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (12 जानेवारी) महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी म्हटले की, 22 जानेवारीपर्यंत आपण सर्वांनी देशातील सर्व तीर्थ क्षेत्र आणि मंदिरांची स्वच्छता करण्याचे अभियान चालवले पाहिजे. 

PM Narendra Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा मोहोत्सवाचे (Yuva Mahotsav) उद्घाटन केले. याआधी पंतप्रधान पूजा करण्यासाठी काळाराम मंदिरात (Kalaram Temple) गेले. या मंदिरात स्वच्छताही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभेला संबोधित करत युवांना मोलाचा संदेश देत अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे अपील केले आहे.

पंतप्रधान मोदींनी पुढे म्हटले की, "आपल्या देशातील ऋषीमुनींपासून ते संतांनी देखील युवांमधील शक्तीला सर्वोच्च मानले आहे. महर्षी श्री अरबिंदो (Sri Aurobindo) म्हणायचे की, भारताला आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी युवांच्या विचारांसोबत पुढे जावे लागणार आहे. स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) म्हणायचे की, भारतातील युवांचे चरित्र, बुद्धी यावर भारताची वाटचाल ठरणार आहे. श्री अरबिंदो आणि स्वामी विवेकानंदांचे हे मार्गदर्शन आज वर्ष 2024 मध्ये भारतातील युवांसाठी एक मोठी प्रेरणा आहे."

भारत जगातल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आलाय -पंतप्रधान नरेंद्र मोदी 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात म्हटले की, आज भारत जगातील पाच अर्थव्यवस्थांमध्ये आला आहे. यामागे भारतातील युवांची ताकद आहे. आज भारत जगातील टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये आला आहे. याशिवाय भारत एकापेक्षा एक उत्तम नवीन्यपूर्ण गोष्टी करत आहे.

इतिहासात नाव कोरण्याची संधी
युवांना संबोधित करताना पंतप्रधानांनी म्हटले की, “काळ प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक सोनेरे क्षण देतो. भारतातील युवांसाठी ही संधी अमृतकाळाच्या रुपात समोर आली आहे. तरुणांकडे इतिहास रचणे आणि इतिहासात नाव कोरण्याची संधी आहे. माझे सौभाग्य आहे की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्व युवांमध्ये मी नाशिकला आलो आहे. मी तुम्हा सर्वांना 'राष्ट्रीय युवा दिवसा'निमित्त (National Youth Day) शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे तुमचे सामर्थ्य, सेवाभाव देशाला आणि समाजाला आणखी नव्या उंचीवर घेऊन जाईल. तुमचे प्रयत्न, परिश्रम युवा भारताच्या शक्तीचा झेंडा जगभरात फडकवतील.”

1 कोटी 10 लाख युवांनी केले रजिस्ट्रेशन
पंतप्रधानांनी म्हटले की, युवांनी असे काम करावे की येणारी पिढी तुम्हाला आणि तुमच्या पराक्रमाची आठवण काढेल. याशिवाय ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat) संघटनेची स्थापना केल्यानंतर हा पहिलाच युवा दिवस आहे. अद्याप संघटना स्थापन करून 75 दिवसही पूर्ण झालेले नाही आणि 1 कोटी 10 लाखांच्या आसपास युवांनी यामध्ये रजिस्ट्रेशन केले आहे.

आणखी वाचा : 

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजपासून 11 दिवस विशेष अनुष्ठान, ऑडिओ संदेशात जनतेला दिला खास संदेश

Swachh Survekshan : देशातील सुरत आणि इंदूर सर्वाधिक स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या ठिकाणांचाही समावेश

PM Modi Lakshadweep Visit : जगभरात इंटरनेटवर लक्षद्वीपबद्दल करण्यात आले सर्वाधिक सर्च, मोडला 20 वर्षांचा रेकॉर्ड