PM Narendra Modi : भाजपचा जाहीरनामा कसा असावा? NaMo अ‍ॅपद्वारे थेट पंतप्रधान मोदींना पाठवा सूचना

| Published : Jan 25 2024, 07:08 PM IST / Updated: Jan 25 2024, 07:35 PM IST

namo app

सार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी अवघे काही महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराची थीम देखील लाँच केली.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणत्या मुद्यांचा समावेश असावा, याबाबत आपणही आपल्याही सूचना नोंदवू शकता. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्वतः सर्वसामान्य जनतेला आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, देशाची राजकीय प्रक्रिया बळकट करण्यासाठी सर्वसामान्यांचा सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यामुळे सरकार आणि जनता यांच्यातील नाते अधिक मजबूत होते. त्यामुळे भाजपने (BJP) आपल्या जाहीरनाम्याबाबत सर्वसामान्यांकडून मत मागवले आहे.

नमो अ‍ॅपवर पाठवू शकता सूचना

तुम्हाला देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय भूमिका निभावायची असेल आणि भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये आपले मुद्दे-मत नोंदवायचे असतील, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. यासाठी तुम्ही नमो अ‍ॅपवर आपण आपल्या सूचना पाठवू शकता किंवा www.narendramodi.in या वेबसाइटवर देखील तुम्ही तुमच्या सूचना नोंदवू शकता. वेबसाइटवर आपल्या सूचना नोंदवण्यासाठी तुम्हाला लॉग इन करावे लागेल किंवा सामान्य प्रक्रियेनुसार नोंदणी करून आपल्या सूचना आपण पोस्ट करू शकता.

पंतप्रधान मोदी यांनी केले आवाहन

भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये काय असावे? तरुणांसाठी काय असावे? हे तुम्हीच ठरवा, असे पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे. मतदान करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सूचना द्याव्यात, अशी माझी इच्छा आहे.

“भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये तरुणवर्गाचा जास्तीत जास्त सहभाग असावा, अशीही माझी इच्छा आहे. ज्या सूचना चांगल्या असतील, अमलात आणण्याकरिता योग्य असतील, त्या तरुणांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भाजपाने लाँच केली निवडणुकीच्या प्रचार मोहिमेची थीम

दरम्यान भाजपाने लोकसभा निवडणूक 2024साठी पक्षाच्या प्रसार मोहिमेची थीम लाँच केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी (25 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही थीम लाँच केली.

आणखी वाचा : 

IESA Vision Summit 2024 : सरकार लवकरच इंडिया सेमीकंडक्टर रीसर्च सेंटरची स्थापना करणार - राजीव चंद्रशेखर

Lok Sabha Elections 2024 : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम

Lok Sabha Elections 2024 : या तारखेला होणार का लोकसभा निवडणुका? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले उत्तर

Exclusive : पंतप्रधान मोदींचे कौतुक करत पी. गोपीचंद म्हणाले की, 'राम मंदिरामुळे रामराज्य येईल'