'जय श्री राम'च्या जयघोषात दिल्लीहून अयोध्येला विमानाचे पहिले उड्डाण, पाहा VIRAL VIDEO

| Published : Dec 30 2023, 10:09 PM IST / Updated: Jan 12 2024, 01:32 PM IST

First flight to Ayodhya

सार

Viral Video: राजधानी नवी दिल्लीहून अयोध्येसाठी शनिवारी (30 डिसेंबर 2023) इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने पहिले उड्डाण भरले. उड्डाण भरण्यापूर्वी प्रवाशांनी ‘जय श्री राम‘चा जयघोष केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Ayodhya Flight Viral Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर काही तासांनी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीहून अयोध्येसाठी पहिले उड्डाण भरले. यावेळेस टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाच्या कॅप्टनने खास पद्धतीने प्रवाशांचे स्वागत केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅप्टन आशुतोष शेखर यांनी प्रवाशांसोबत संवाद साधताना म्हटले की, "माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की इंडिगो एअरलाइन्सने या महत्त्वाच्या फ्लाइटची जबाबदारी माझ्यावर सोपवली. इंडिगो आणि आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्हाला आशा आहे की तुमचा प्रवास सुखद आणि मंगलमय होईल". यानंतर 'जय श्री राम' म्हणत त्यांनी आपल्या घोषणेची सांगता केली.  

यानंतर प्रवाशांनीही 'जय श्री राम'चा जयघोष केला आणि विमानामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अयोध्या धामच्या प्रवासादरम्यान विमानात प्रवाशांनी हनुमान चालिसाचे पठणही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले विमानतळाचे उद्घाटन

आणखी वाचा :

रामललांना मिळाले कायमस्वरुपी घर, 22 जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करा - PM नरेंद्र मोदी

SPG कमांडोने सेल्फी घेण्यास रोखले, पण पंतप्रधान मोदींनी मुलांची इच्छा अशी केली पूर्ण

Ayodhya Dham Station : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमृत भारत व वंदे भारत गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

Read more Articles on