मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाला पॅनिक अटॅक आला. यावेळी सहप्रवाशाने त्याला मारहाण केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगोने मारहाण करणाऱ्या प्रवाशाला सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले.
मुंबई: मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये ३२ वर्षीय हुसैन अहमद माजुमदार नावाच्या युवकाला पॅनिक अटॅक आला. त्यावेळी त्याला मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ वाटत होतं आणि त्याला यावेळी सोबत असणाऱ्या एका प्रवाशाने तोंडात मारली. हा प्रकार विमानातच घडला आणि त्यानंतर त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी प्रतिक्रिया दिली
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाव व्हायरल झाला. काही प्रवाशांनी मारणाऱ्याच समर्थन केलं तर काहींनी म्हटले की परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कमालीचा क्षण असल्यामुळे यात्रेकरू व कर्मचार्यांनी युवकाला आवरले आणि शांत करण्याचा प्रयत्न केला.
इंडिगोने प्रवाशाला सुरक्षारक्षकाकडे केलं सुपूर्द
इंडिगोच्या वतीने मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. त्या प्रवासाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. हुसैनचे कुटुंबीय विमानतळावर त्याची वाट पाहत होते, पण तो पोहोचला नाही. त्याकरता स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता प्रकरण नोंदवण्यात आलं आहे.
या घटनेमुळे विमान प्रवाशांची मानसिक स्थिती आणि प्रवासामध्ये राबवले जाणारे मानवी सेवा नियम हे मुद्दे समोर आले आहेत. पॅनिक अटॅक किंवा मानसिक आजार असलेल्या स्थितीत असलेल्या यात्रेकरूंना सहानुभूतीपूर्ण वागणूक देणे आवश्यक ठरते. तसेच, या संदर्भात इंडिगोने आणि सुरक्षा संस्थांनी यात शिस्तीने वागणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
