सर्वोच्च न्यायालयाने नवीन प्रभाग रचनेला हिरवा झेंडा दिला असून ओसीबी आरक्षणही लागू केले आहे. त्यामुळे आता राजकीय तयारी सुरु होण्याची शक्यता आहे.
पुण्याहून लेह लडाखला जाण्यासाठी विमान प्रवास हा सर्वात जलद पर्याय आहे, तर रस्त्याने जाणे हा एक साहसी अनुभव देणारा पर्याय आहे. रस्त्याने जाताना उच्च हिमालयातील धोकादायक पण सुंदर पर्वतीय शिखरे पार करावी लागतात आणि प्रवासात विश्रांती घेणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली- राज्यसभा खासदार, माजी केंद्रीय मंत्री, झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे संस्थापक सदस्य शिबू सोरेन यांचे सोमवारी दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते.
सुरतमधील भटार भागात मैत्री बंगल्यामध्ये दोन कुटुंब अनेक वर्षे एकत्रित राहत आहेत. खरंतर, नातेसंबंधाचे एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहिले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले शिबू सोरेन यांना जूनच्या अखेरीस मूत्रपिंडाच्या समस्येमुळे दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काही तासांच्या अंतराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे ही भेट अधिक चर्चेत आली आहे.
कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगली-कोल्हापूर पुरासाठी महाराष्ट्राचे दुर्लक्ष आणि समन्वयाचा अभाव याला जबाबदार धरले आहे. त्यांनी एका तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा पुनरुच्चार केला आहे.
नवी दिल्ली - मोदी सरकारने १६ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती, मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ लोटूनही कोणतीही अधिकृत अधिसूचना अद्याप आलेली नाही. याबाबत मोदी सरकारने राज्यसभेत काय उत्तर दिले ते जाणून घ्या.
मुंबई - उत्तर भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते. दक्षिण भारतातही हा उत्साह दिसून येतो. रंगोळीपासून कृष्णाच्या बाहुल्यांपर्यंत, सीदायपासून मंदिरातील भक्तीगीतांपर्यंत हा उत्सव भक्ती, परंपरा आणि पारंपरिक खाद्यपदार्थ यांचा संगम घडवतो.
बेळगावीत सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळून १३ विद्यार्थ्यांना विषबाधा केल्याप्रकरणी तीन जणांना अटक. मुस्लीम मुख्याध्यापकांना अडकवून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा त्यांचा कट होता, असे पोलिसांचे म्हणणे.
India