आरबीआयने धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ५.५% वर राहील आणि पुढील निर्णय आर्थिक निर्देशकांवर अवलंबून असेल.
उत्तराखंडमधील गंगोत्रीच्या मार्गावरील धराली गावात ढगफुटीमुळे भीषण पूर आला. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून ६०-७० लोक चिखलात अडकले आहेत. हॉटेल्स, होमस्टे आणि रेस्टॉरंट्ससह गावाचा अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे.
कोलकाता : सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने कळवले होते की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची सुनावणी मंगळवारी होईल. त्यानुसार आज सुनावणी झाली. आज महागाई भत्त्याबाबत राज्य सरकारने आपले स्पष्ट मत मांडले आहे.
हर्षवर्धन नवाथे हे केबीसीचे पहिले करोडपती होते. त्यांनी केवळ २१ मिनिटांत १ कोटी रुपये जिंकले. केबीसीनंतर त्यांनी एमबीए केले आणि आता ते जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे सीईओ आहेत.
उत्तराखंडच्या उत्तरकशी जिल्ह्यातील हर्षील भागात खीर गंगा नदीजवळ ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने संपूर्ण खीर गंगा गाव वाहून गेले आहे. या पुरात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून अनेक जण चिखलाखाली गाडले गेले आहेत.
देहरादून - उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात भीषण ढगफुटी आणि भूस्खलन झालं आहे. यामुळे गंगोत्री धामला जाणारा रस्ता बंद झाला आहे. अनेक लोक अडकले असून बचावकार्य सुरू आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.
अखेर देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला आहे. ही प्रक्रिया 2 ऑगस्टपासूनच सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.
Rahul Gandhi News : चीनने भारताचा भूभाग बळकावल्याच्या राहुल गांधींच्या विधानावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने गांधींना 'खरे भारतीय असता तर असं विधान केलंच नसतं' असा सवाल केला.
मुंबई - स्वातंत्र्यदिन हा भारतातील महान संघर्षाचा विजय आणि त्या संघर्षात अमूल्य योगदान देणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन करण्याचा दिवस. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली.
India