उत्तराखंडमधील गंगोत्रीच्या मार्गावरील धराली गावात ढगफुटीमुळे भीषण पूर आला. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून ६०-७० लोक चिखलात अडकले आहेत. हॉटेल्स, होमस्टे आणि रेस्टॉरंट्ससह गावाचा अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे.
उत्तराखंडमध्ये मंगळवारी दुपारी हाहाकार उडाला आहे. भाविकांनी यावेळी निसर्गाचे रौद्ररूप दिसून आलं आहे. खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या भीषण महापुरामुळे गंगोत्रीच्या मार्गावरील धराली गावाचा सुमारे अर्धा भाग चिखलात गाडला गेला. या नैसर्गिक संकटात चौघांचा मृत्यू झाला असून, ६०-७० जण चिखलात अडकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हॉटेल, होमस्टे आणि रेस्टॉरंटची संख्या जास्त
धराली गाव गंगोत्रीच्या मार्गावरील मुख्य थांबा असल्याने येथे नदीच्या काठावर हॉटेल, होमस्टे आणि रेस्टॉरंटची संख्या मोठ्या प्रमाणावर मोठी होती. द्गगफुटीनंतर वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून माती, दगडगोटे आणि दरड डोंगरावरून खाली आल्याचे चिखलासोबतच महापूर आला होता. हा महापूर नदीचा प्रवाह गावात शिरल्याने धराली गावात चिखल आणि दगडगोटे शिरले होते.
महापुरात सगळं वाहून गेलं
या महापुरात येथील घरे, वाहने, झाडे, हॉटेल, रेस्टॉरण्ट, तीन-चार मजली होम स्टे अगदी कस्पटाप्रमाणे वाहून गेली. प्राथमिक माहितीनुसार महापुरामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या ठिकाणचा व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या ताज्या दृश्यांमध्ये निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळते.
डोंगरावरून प्रचंड वेगाने खाली झेपावणारे चिखलमिश्रित पाण्याचे लोट वाटेत येणारी झाडे, घरे, हॉटेल व अन्य इमारतींना क्षणार्धात ध्वस्त करत पुढे सरकताना दिसतात. एकाच डोंगरावरून दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून पाण्याचे लोट प्रचंड वेगाने पाण्याचे प्रवाह मोठ्या प्रमाणावर खाली वाहत येत असताना दिसून आले आहेत.
बचावकार्यात अडथळे
दुपारपासून कोसळणारा पाऊस संध्याकाळपर्यंत कायम राहिल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच जवळच्या हर्शिल गावातील लष्कराचे पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत व बचावकार्य सुरू केले.ढगफुटीमुळे संबंधित ठिकाणाची चहुबाजुंनी कोंडी झाल्याचं दिसून आलं होत. मातीचे ढिगारे चिखल आणि पाण्यामुळे धरालीला जोडणारे व इतरत्रचे १६३ रस्ते बंद झाले आहेत. यामध्ये पाच राष्ट्रीय महामार्ग व सात राज्य महामार्गांचा समावेश आहे.
