उत्तर प्रदेशातील कुशीनगरहून बिहारमधील नरकटियागंजपर्यंत एका अजगराने ट्रकच्या इंजिनमध्ये लपून १०० किमीचा प्रवास केला. मजुरांना ट्रकमधून दगड उतरवताना अजगर आढळला आणि नंतर वनविभागाने त्याला जंगलात सोडले.
हैदराबादमधील कुशैगुडा-नगरम रस्त्यावर तेलगळतीमुळे अनेक बाइक्स घसरून पडल्या, ज्यामुळे अनेक बाइकस्वार जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावर माती टाकली आणि वाहतूक सुरळीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळासह 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट पाहिला. यावेळी विक्रांत मॅसी, रिद्धी डोग्रा, राशी खन्ना, कंगना रणौत आदी उपस्थित होते. २००२ च्या गोध्रा रेल्वे दुर्घटनेच्या आधीच्या घटनांवर हा चित्रपट आधारित आहे.
सुरतमध्ये एका ३४ वर्षीय महिला भाजप नेत्याने रविवारी दुपारी आत्महत्या केली. त्यांनी गळफास घेण्यापूर्वी भाजप नगरसेवकाला फोन केला होता. नातेवाईकांनी हत्येचा आरोप केला आहे.
परदेशात काम करून स्थिरायचे हे अनेकांचे स्वप्न असते. काही देश परदेशी प्रतिभांना आकर्षित करण्यासाठी आणि भारतीय व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कार्य व्हिसा प्रक्रिया सुलभ करतात.
बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वेला आता मागणी जास्त आहे. कितीही दूरचा प्रवास असला तरी लगेच पोहोचायचे आहे. वेळ वाचवायचा आहे. पण भारतातील ही रेल्वे याच्या उलट आहे. केवळ ४६ किलोमीटरच्या प्रवासासाठी ही रेल्वे तब्बल ५ तास घेते.
हातात घेतल्यावर बाळ नाग आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार फणा काढतो आणि जिभ बाहेर काढतो आणि हातातून खाली सरकतो.
आपल्या कारमधील समस्या, सर्व्हिस, कर्मचाऱ्यांचे वर्तन, स्पेअर पार्ट, कार डिझाइनसह ग्राउंड लेव्हलच्या समस्या सोडवा. एका व्यक्तीने महिंद्रा कारबद्दल अत्यंत वाईट टीका केली आहे. या टीकेला स्वतः आनंद महिंद्रा यांनी दिलेले उत्तर सर्वांच्या पसंतीस उटले आहे.
बेंगळुरूमध्ये पासपोर्ट पडताळणीसाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने एका तरुणीला मिठी मारण्यासाठी विनंती करून छळ केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे.
संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने दिल्लीत कूच केली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी नोएडा-दिल्ली बॉर्डरवर 5 हजार पेक्षा जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. शेतकरी जमीन अधिग्रहण, भरपाई आणि रोजगारासारख्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.
India