संयुक्त किसान मोर्चा(SKM)संघटनेच्या हजारो शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा विरोध करत दिल्लीकडे कुच केली आहे.
Image credits: Our own
Marathi
चिल्ला बॉर्डरवर बॅरिकेटींग
दिल्ली-यूपीला जोडणाऱ्या चिल्ला बॉर्डवर बॅरिकेटींग करण्यात आली आहे. परंतु मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेटींग तोडून टाकली आहे. शेतकरी दिल्लीकडे कुच करत आहेत
Image credits: Our own
Marathi
नोएडा-दिल्ली बॉर्डरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी नोएडा-दिल्ली बॉर्डरवर मोठ्या प्रमणावर बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५ हजारपेक्षा जास्त जवान तैनात करण्यात आले आहे. ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्राफिक जाम झाली आहे.
Image credits: Our own
Marathi
कंटेनर-क्रेनवर चढले शेतकरी
दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यात कंटेनर-क्रेन उभे केले, परंतु शेतकरी गोंधळ करत कंटेनर-क्रेनवर चढले आणि घोषणाबाजी करू लागले.
Image credits: Our own
Marathi
नोएडा एक्सप्रेस वे दोन्ही बाजूंनी बंद
शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिंसाना सांगितले की ते दिल्लीला नक्की जातील आणि संसदेत जाऊन त्यांचा हक्क घेणार.
Image credits: Our own
Marathi
यमुना एक्सप्रेस वे वर ट्राफिक जाम
दिल्ली-नोएडात युपीला लागुन असलेल्या सीमेवर ट्राफिक जाम झाली आहे. यमुना एक्सप्रेस-वेवर वाहनांची मोठी रांग लागली आहे.
Image credits: Our own
Marathi
या आहेत शेतकऱ्यांच्या चार मागण्या
१.शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाच्या बदल्यात १० टक्के प्लॉट देणे. २.६४.७ टक्केच्या दराने भरपाई मिळावी. ३.नवीन भूमी अधिग्रहन रक्कम मिळावी. ४.भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार द्यावा.
Image credits: Our own
Marathi
चिराग पासवान यांनी शेतकऱ्यांना बोलावले
शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन मंत्री चिराग पासवान म्हणाले की सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकण्यास तयार आहे. चर्चेतून समस्या सुटतील.
Image credits: Our own
Marathi
शेतकरी नेत्यांना केली अटक
नोएडा पोलिसांनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगेश्र्वर दत्त शर्मा यांच्यासहित १० नेत्यांना ताब्यात घेतले आहे. नोएडाचे एसपी शिवहरी मीनांनी सांगितले की शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे.