मुंबई गोवा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर दरोडा टाकण्यात आला. ट्रकच्या मागून येणाऱ्या गाडीतल्या ड्रायव्हरने याचा व्हिडीओ काढला असून तो सोशल मीडियावर सगळीकडे ट्रेंडिंगमध्ये आहे.
दिल्ली येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्यामुळे सात बालकांचा मृत्यू झाला आहे. येथे दोनही बाजूने आग लागल्यामुळे बालकांना वाचवण्यासाठी खिडकी तोडण्यात आली आणि इतर बालकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला केदारनाथ येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असून भाविकांचा येथे महापूर लोटल्याचे दिसून येत आहे. राजेश साहू या एक्स अकाऊंटवरून टाकलेल्या व्हिडिओमध्ये लांबच लांब रांगा असून त्यामध्ये भाविक दर्शनासाठी उभे असल्याचे दिसून आले आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात डंपरने बसला धडक देऊन तो परत कोसळल्यामुळे ही घटना घडली आहे.
शनिवारी उशिरा दिल्ली येथे चिल्ड्रेन हॉस्पिटलला आग लागली असून यामध्ये बारा बालकांचा मृत्यू झाला आहे. इतरही अनेक बालक जखमी झाले असून अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
गुजरातच्या राजकोटमधील एका गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
सध्या उत्तर भारत चांगलाच तापला असून उष्णतेची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय.
PM Kisan योजनेचा 17 वा हप्ता जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पण त्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा हे काम तुम्ही हा हप्ता येण्यापूर्वीच पूर्ण करा.
जून महिन्यामध्ये पाच रविवार येतात. विकली ऑफ असल्यामुळे 5 दिवस बँकेला सुट्टी राहणार आहे. यावेळी सुट्ट्या जोडून येत असल्यामुळे अनेकांनी त्यांच्या सुट्टीचे नियोजन केलेले आहे.
राजस्थानची राजधानी जापूर येथील पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. येथे प्रतिष्ठित घरातील मुले आणि मुली लज्जास्पद अवस्थेत सापडली असून यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.