सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. हे मंदिर नऊ एकरात पसरलेले असून, १२ वर्षांच्या बांधकामानंतर पूर्ण झाले आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जानेवारी बुधवारी नवी मुंबईतील खारघर येथे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. हे मंदीर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. मंदीर एकुण नऊ एकरात पसरलेले आहे. गेल्या १२ वर्षांपासून या मंदिराचं बांधकाम सुरू होतं.
भगवान कृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचं नाव 'श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर' असं आहे. इस्कॉन मंदिरात जवळपास ३ हजार भाविकांसाठी एकत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरात वैदीक शिक्षणाचं केंद्रही आहे. परदेशी भक्तही येथे येऊन अध्ययन करू शकतील. इस्कॉन मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत जवळपास २०० कोटींचा खर्च करण्यात आला असून भक्तांनी दान केलेल्या पैशातून मंदिराची उभारणी करण्यात आली.
आणखी वाचा- PM Modi In Mumbai : PM मोदींनी नौदलाच्या तीन लढाऊ जहाजांचे केले लोकार्पण
पांढऱ्या आणि तपकिरी संगमरवराच्या खास दगडांनी बांधलेले हे भव्य मंदिर आहे. मंदिराचा गाभा भगवान कृष्णाच्या अनेक मनोरंजक ३ डी चित्रांची प्रदर्शनी लावण्यात आले आहे. मंदिराचा मुख्य भाग भगवान श्रीकृष्णाच्या थ्रीडी पेंटिंगने सजवण्यात आलाय आहे. त्याचबरोबर दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत. ज्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा कोरल्या आहेत. रविवारी भाविकांसाठी मोफत प्रसादाचीही व्यवस्था असेल.