भिकारी वर्गाला अनेकदा समाजाकडून दुर्लक्ष आणि गरिबीचा सामना करावा लागतो, परंतु भारतात काही भिकारी असे आहेत ज्यांच्याकडे आलिशान जीवन आणि संपत्ती आहे.
सर्वात श्रीमंत भिकार्यांच्या यादीत पहिले नाव भरत जैन यांचे आहे. ते दरमहा भीक मागून ७५००० रुपये कमवतात.
कोलकाता येथे राहणारी लक्ष्मी दररोज भीक मागून १००० रुपये कमवते. ती महिन्याला ३० हजार रुपये कमवते.
मुंबईतील चर्नी रोड जवळ राहणारी गीता भीक मागते आणि कथितपणे त्या पैशातून तिने एक फ्लॅट खरेदी केला आहे. ती तिच्या घरी भावासोबत राहते.
बिहारच्या पटना येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागणारा पप्पू देखील श्रीमंत भिकार्यांच्या यादीत आहे. त्याच्याकडे १.२५ करोडची संपत्ती आहे.
भारतात असे श्रीमंत भिकारी आहेत ज्यांच्याकडे नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त बचत आहे. या भिकार्यांकडे स्वतःचे अपार्टमेंट आणि फ्लॅट आहेत.
IITian अभय सिंह: एरोस्पेस सोडून महाकुंभमध्ये साधू
भारतीय सैन्याविषयी १० अविश्वसनीय तथ्ये; भारतीय लष्कर जगात का आहे खास?
भारतीय सेनेची १० रोचक तथ्ये: जाणून घ्या तिचे वैशिष्ट्ये
नौदलाच्या ताफ्यात ३ शक्तीशाली युद्धनौकांचा समावेश; जाणुन घ्या नावे