रियान पराग यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने वादात सापडला आहे. त्याची गेमिंग सत्रांचे लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना काही कॉपीराइट मुक्त संगीत शोधत होता तेव्हा त्याची यूट्यूब हिस्ट्री लीक झाली.
पालीगंजमधील राहुल गांधी यांच्या सभेत स्टेज खचला आहे. यावेळी राहुल गांधी यांना राजद उमेदवार मिसा भारती यांनी हात देत सावरले. पाहा संपूर्ण व्हिडिओ.
भाजप नेते तजिंदर बग्गा यांनी AAP मंत्री बलकार सिंह यांनी नोकरीच्या शोधात असलेल्या मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर कपडे काढून हस्तमैथुन केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर विविध धार्मिक ग्रंथांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा भाजपने आरोप केला आहे. भाजपने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ममता बॅनर्जींची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली
सनरायझर्स टीम हरल्यानंतर या टीमची चर्चा होताना दिसून येत आहे. या संघाच्या सह मालकीण काव्या मारन यांनी संघ हारल्यानंतरही खेळाडूंना प्रोत्साहित केल्यामुळे प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले असून असेच संघाचे मालक हवेत अशा कमेंट केल्या आहेत.
गुजरातमधील राजकोट दुर्घटनेतील आरोपींची केस लढवण्यास वकिलांनी नकार दिला आहे. यासंदर्भातील घोषणाच बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये ५ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तब्येतीचे कारण देऊन अतिरिक्त जामीन मागितला आहे. त्यांच्या वकिलांनी टेस्ट बाकी असून यासंदर्भात तपासणीसाठी जामीन आवश्यक असल्याचे न्यायालयात म्हटले आहे.
अग्निशमन एनओसी नव्हती - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमिंग झोनकडे चालवण्यासाठी आवश्यक परवाने नव्हते आणि राजकोट महानगरपालिकेकडून फायर क्लिअरन्ससाठी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) ची नोंद नव्हती.
राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी एक नवीन खुलासा केला आहे. त्यांनी आपल्याला मारहाण झाल्यानंतर संजय सिंह हे भेटायला आले होते अशी माहिती दिली आहे. त्यांनी आपली तब्येतीची विचारपूस घेऊन काळजी घेण्यास सांगितले होते हे म्हटले आहे.
राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये झालेल्या अपघातात 30 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काही मृतदेहांची ओळख पटलेली नसून त्यांचे डीएनए राजकोट येथील लॅबमध्ये पाठवून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.