ICICI Bank iMobile glitch: खाजगी क्षेत्रातील ICICI बँक वापरकर्त्यांना iMobile-Pay ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी आढळण्याने समस्यांचा सामना करावा लागला आहे.यामध्ये १७ हजार क्रेडिट कार्ड धारकांची माहिती लीक झाली असून बँकेने यावर त्वरित काम सुरु केले आहे.
Google Search : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदांनी नुकत्याच अमेरिकेतील वारसा कराबद्दल केलेल्या विधानामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. अशातच बहुतांशजणांनी गुगलवर वारसा कर म्हणजे नक्की काय हे सर्वाधिक सर्च केले आहे.
भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळल्याची माहिती समोर आली असून तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान नियमितपणे उड्डाण करत होते. त्यावेळी हा अपघात झाला.यामध्ये अजून जीवित वा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
Crime : पटनामध्ये जेडीयू पक्षाच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. सौरभ कुमार असे नेत्याचे नाव असून लग्नसमारंभावरून परतताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
RBI on Kotak Mahindra Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई करत नव्या ग्राहकांसह क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी बंदी घातली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला मोठी रंगत आली असून यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. यवतमाळ येथील शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेला संबोधित करत असताना राजश्री पाटील यांच्या सभेला करत होते.
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. पण या हल्ल्यात कोणीतरी अशी लज्जास्पद गोष्ट बोलेल, याचा कोणी विचार केला नव्हता.
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वारसा कर लागू करण्याची वकिली केल्यानंतर या विषयावरील चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर लोक या संदर्भात आपली मते मांडत आहेत आणि जुन्या बातम्या शेअर करत आहेत.
पवन कल्याण हा चित्रपट क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता असून तो आंध्र प्रदेशात निवडणुकीला उभा राहिला आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाची छोटीशी चूकही महागात पडू शकते. अशा स्थितीत सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेच्या वारसा कराची वकिली करणे काँग्रेससाठी अडचणीचे ठरले आहे.