बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. सत्ताधारी शिवसेना नेते राजेश शहा यांचा २४ वर्षीय मुलगा मिहीर शाह याने ७ जुलैला पहाटे साडेपाच वाजता स्कूटरवरून मासे खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या जोडप्याला धडक दिली.
भारताच्या सरन्यायाधीशांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका मंजूर केली आहे. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
PM Modi in Russia : राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे म्हणणे मान्य करत रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय तरुणांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
वसंत मोरे हे परत एकदा दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचे दिसून आले आहे. सध्या सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून सुरुवातीला मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला.
विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी आसाम आणि मणिपूरचा दौरा केला. मणिपूर हिंसाचार आणि आसाम पूरग्रस्तांना भेटण्यासाठी राहुल गांधी येथे आले आहेत. मणिपूरमधील हिंसाचारामुळे 67 हजार लोक विस्थापित झाले आहेत.
Rahul Gandhi Viral Video : हिंदूंबद्दलच्या वादग्रस्त टीकेला उत्तर देण्यासाठी मंदिरात डोअरमॅट म्हणून राहुल गांधींची प्रतिमा दर्शविणारा एक कथित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल झाला आहे.
देशात NEET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणी, NEET-UG 2024 परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
Terrorist attack in Jammu and Kashmir : यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद झाले. तर लष्कराने 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
ओडिशाच्या सागरी सीमेवर असलेल्या पुरी या तीर्थक्षेत्री भगवान जगन्नाथ रथयात्रेला रविवारी सुरुवात झाली. साधारणत: एक दिवस चालणारा हा महोत्सव अधिक भव्यदिव्य करण्याच्या उद्देशाने यावेळी दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे.
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहराची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन सेवा रविवार 7 जुलै रोजी सकाळी बंद ठेवण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात या सेवा बंद करण्यात आल्या आहेत.