दिवाळी स्पेशल या नावाने राहुल गांधी यांनी व्हिडिओ तयार केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी राहत असलेल्या जनपथ येथील १० नंबरच्या निवासस्थानावर रंगकाम करणाऱ्या कामगारांसोबत राहुल आणि रेहान सामील झाले.
२००६ च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्स आणि २००१ च्या किंगफिशर फॅशन अचिव्हमेंट अवॉर्ड्समध्ये त्यांनी स्थान पटकावले होते. श्रीनगरमध्ये जन्मलेले रोहित बाल यांनी १९८६ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते देशातील सर्वात प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक होते.
जलशक्ती विभागात दैनिक वेतनधारक म्हणून काम करणाऱ्यांवर हा हल्ला झाला आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने गेल्या दहा वर्षांत जिंकलेल्या सर्व निवडणुका फसवणुकीने जिंकल्या आहेत. हरियाणामध्ये रात्रीत बदल झाले. मतमोजणीदरम्यान काँग्रेसचे ६६ जागांवरून एकाएकी ३३ जागांवर येणे शक्य आहे का?’
डिसेंबरमध्ये आरबीआय रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६.२५ टक्के करू शकते.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी उपराज्यपालांना पत्र लिहून छठ पूजेनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मुलगी आईसोबत राहते आणि तिची काळजी घेण्यासाठी आईकडे उत्पन्न आहे, असा युवकाचा युक्तिवाद होता. (प्रतिकात्मक चित्र)
केंद्र सरकारने दर्जाहीन हेलमेट उत्पादक आणि विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. १६२ हेलमेट उत्पादकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत आणि बीआयएस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत.