सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांचा प्रोफाइल पिक्चर बदलला असून त्यांनी त्याबाबतची माहिती ट्विट टाकून दिली आहे. भारत सरकार सलग ३ वर्षांपासून ‘हर घर तिरंगा’ ही योजना राबवत आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांचा प्रोफाइल पिक्चर बदलला असून त्यांनी त्याबाबतची माहिती ट्विट टाकून दिली आहे. भारत सरकार सलग ३  वर्षांपासून ‘हर घर तिरंगा’ ही योजना राबवत आला आहे. त्यामुळेच यावर्षीही अशाच प्रकारचा कार्यक्रम राबवला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.आपण सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो लावून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवू शकता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर काय म्हटले? - 
या वर्षीचा स्वातंत्र्यदिन जसजसा जवळ येत आहे, तसतसे पुन्हा एकदा #हरघर तिरंगा एक संस्मरणीय जनआंदोलन बनवूया. मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि  तुम्हा सर्वांना विनंती करतो की तेच करून आमचा तिरंगा साजरा करण्यात माझ्यासोबत सामील व्हा. आणि हो, तुमचे सेल्फी https://harghartiranga.com वर शेअर करा. या ट्विटला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट मिळताना दिसून येत आहे.