Om Island : निसर्गाने स्वतः घडवलेला 'ओम' आकाराचा बेट, कुठे आहे माहित आहे का?
Om Island: हिंदू धर्मात 'ओम' अत्यंत पवित्र मानला जातो. याच ओमच्या आकारात निसर्गाने एक बेट तयार केले आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या देशातच हा अद्भुत चमत्कार आहे.

ओम बेट..
निसर्गाने रेखाटलेले एक अद्भुत अक्षर.. आकाशातून पाहिल्यावर हे बेट हुबेहूब हिंदू धर्माच्या पवित्र 'ओम' आकारात दिसते. हे माणसाने बनवलेले नाही, तर स्वतः निसर्गाने नर्मदा नदीच्या मध्यभागी घडवलेले रूप आहे. चला पाहूया हे बेट कुठे आहे आणि येथील अद्भूत मंदिर कोणते आहे...
मध्य प्रदेशातील पवित्र नर्मदा नदीच्या लाटांमधून हे 'ओम' आकाराचे बेट निर्माण झाले आहे. याच बेटावर पवित्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वसले आहे. आपल्या देशात एकूण १२ पवित्र ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी ओंकारेश्वर मंदिर हे एक आहे.

ओंकारेश्वर मंदिर कुठे आहे? आणि त्याचे वैशिष्ट्य काय?
मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात, पवित्र नर्मदा नदीच्या मध्यभागी एका छोट्या बेटावर ओंकारेश्वर मंदिर स्थित आहे. या बेटाला मांधाता किंवा शिवपुरी असेही म्हणतात. आकाशातून पाहिल्यावर हे बेट हुबेहूब 'ओम' आकारात दिसते. या नैसर्गिक आकारामुळेच या स्थानाला ओंकारेश्वर हे नाव पडले आहे. विशेष म्हणजे येथे पवित्र नर्मदा आणि कावेरी नद्यांचा संगमही होतो.
या मंदिराला भेट देण्यासाठी योग्य वेळ...
ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात या मंदिराला भेट देणे सर्वात चांगले. या काळात हवामान खूप आल्हाददायक आणि थंड असते. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी हा वेळ उत्तम आहे. एप्रिलनंतर उन्हाळा कडक असतो, त्यामुळे प्रवासात थोडा त्रास होऊ शकतो. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात इथे मोठा उत्सव असतो, जे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
या मंदिराला भेट दिल्यावर नक्की कराव्यात अशा ४ गोष्टी..
नर्मदा नदीत पवित्र स्नान: मंदिरात जाण्यापूर्वी किंवा नंतर नर्मदा नदीत स्नान केल्याने मन आणि आत्मा शुद्ध होतो, असा भाविकांचा विश्वास आहे.
संध्याकाळी नर्मदा आरती: सूर्यास्ताच्या वेळी नर्मदा नदीच्या काठावर होणारी आरती डोळ्यांचे पारणे फेडते. वेद मंत्रांचा घोष आणि दिव्यांच्या प्रकाशात हे आध्यात्मिक वातावरण आयुष्यभर लक्षात राहते.
सस्पेन्शन ब्रिज (झुलता पूल) वरील फेरफटका: नदी आणि बेटाला जोडणाऱ्या या झुलत्या पुलावरून चालताना नर्मदा नदीचे सौंदर्य मन मोहून घेते. फोटोग्राफीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
ओंकारेश्वर परिक्रमा: भाविक 'ओम' आकाराच्या या बेटाभोवती पायी परिक्रमा करतात. वाटेत दिसणारी छोटी मंदिरे, घाट आणि हिरवागार निसर्ग मन शांत करतात. आयुष्यात एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्यावी.

