अरविंद केजरीवाल यांच्या अटक घटनेवर जुन्या सहकाऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया, अनेकांना केजरीवाल निर्दोष असल्याची खात्री

| Published : Mar 26 2024, 01:01 PM IST

Kumar vishwas on kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या अटक घटनेवर जुन्या सहकाऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया, अनेकांना केजरीवाल निर्दोष असल्याची खात्री
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. त्यानंतर लोकपाल आंदोलनाच्या वेळेला त्यांच्या सोबत असलेल्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. त्यानंतर लोकपाल आंदोलनाच्या वेळेला त्यांच्या सोबत असलेल्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी कोणती मत व्यक्त केली आहेत ते आपण जाणून घेऊयात. 

यावर बोलताना कवी कुमार विश्वास यांनी म्हटले की,  त्यांनी एक कविता सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली आहे. त्यांनी ‘कर्म प्रधान विश्व रची  राखा, जो तस करही सो तस फल चाखा’ ही कविता पोस्ट केली आहे. या कवितेचा अर्थ आपण जसे कर्म करू तसे आपल्याला फळ मिळते असा होतो. थोडक्यात कुमार विश्वास हे कमी शब्दांमध्ये खूप बोलून गेले आहेत. 

सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काय झाला हे लोकांना माहित असून तेच आता न्याय करतील असे म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या केल्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रशांत भूषण यांनी ही अटक कोणत्याही कागदपत्रांशिवाय झाली असून भाजपवरच टीका केली आहे. या घटनेवर विविध पक्षातील लोकांनी प्रतिक्रिया दिल्या असून अरविंद केजरीवाल यांच्याबाबत समाजातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 
आणखी वाचा - 
होळीच्या दिवशी दिल्लीत नवऱ्याने चिरला बायकोचा गळा, पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर बायको दिसली रक्ताच्या थारोळ्यात
Lok Sabha Election : राजस्थानमधील या चार महिला उमेदवारांवर असणार नजर, पराभव होऊनही पक्षाने दिलेय तिकीट