Non Veg Food Ban in 15 km Radius of Ayodhya Ram Temple : अयोध्या राम मंदिराच्या १५ किलोमीटरच्या परिसरात मांसाहार वितरणावर प्रशासनाने बंदी घातली आहे. हॉटेल्स, होम-स्टे आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी ही बंदी लागू असेल.  

Non Veg Food Ban in 15 km Radius of Ayodhya Ram Temple : अयोध्या राम मंदिराच्या १५ किलोमीटरच्या परिसरात मांसाहार वितरणावर अयोध्या प्रशासनाने बंदी घातली आहे. 'पंचकोसी परिक्रमा' मार्गावरील परिसरात ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे मांसाहार वितरणाविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परिसरातील होम-स्टे आणि हॉटेल्सना मांसाहार न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अयोध्येतील काही हॉटेल्स आणि होम-स्टे मांसाहार आणि मद्य पुरवत असल्याचे वृत्त असून, या आस्थापनांना कडक सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अयोध्या आणि फैजाबादला जोडणाऱ्या १४ किलोमीटर लांबीच्या 'राम पथ' मार्गावर मद्य आणि मांसाहाराच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय अयोध्या महानगरपालिकेने मे २०२५ मध्ये घेतला होता. या मार्गावर अजूनही वीसहून अधिक दारूची दुकाने सुरू आहेत. "राम पथावरील मटणाची दुकाने महापालिकेने हटवली आहेत. मात्र, दारूच्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची विशेष परवानगी आवश्यक आहे," असे अयोध्या प्रशासनाने सांगितले.