NIA Arrests 7 Foreign Nationals For Training Separatists In India After Russian Tip Off: भारताविरोधात दहशतवादी कट रचल्याच्या आरोपावरून NIA ने ७ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. रशियन तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई झाली. हे लोक ईशान्येकडील राज्यांमधील फुटीरतावादी गटांना प्रशिक्षण देत होते, असं समोर आलं आहे.

NIA Arrests 7 Foreign Nationals For Training Separatists In India After Russian Tip Off नवी दिल्ली: फुटीरतावादी संघटनांना प्रशिक्षण दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या परदेशी नागरिकांच्या चौकशीत NIA ला नवी माहिती मिळाली आहे. या ट्रेनिंगसाठी एकूण २० परदेशी नागरिक भारतात आले होते. धक्कादायक म्हणजे, या लोकांच्या भारतातील हालचालींची माहिती रशियन गुप्तचर यंत्रणांनी भारताला दिली होती. या २० जणांना चार वेगवेगळ्या बॅचमध्ये ट्रेनिंग देण्यात आल्याचंही समोर आलं आहे.

भारताविरोधात दहशतवादी कारवायांचं नियोजन केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ६ युक्रेनियन आणि एका अमेरिकन नागरिकाला अटक केली आहे. गेल्या आठवडाभरात देशाच्या वेगवेगळ्या भागांतून त्यांना पकडण्यात आलं. दिल्ली, लखनौ आणि कोलकाता विमानतळांवरून या सात जणांना NIA ने ताब्यात घेतलं. अटक केलेला अमेरिकन नागरिक कोलकाता विमानतळावरून, तर इतर आरोपींपैकी तिघे लखनौ आणि तिघे दिल्लीतून पकडले गेले. ईशान्य भारतातील फुटीरतावादी संघटनांसोबत मिळून त्यांनी हा कट रचल्याचा आरोप आहे.

या अमेरिकन आणि युक्रेनियन नागरिकांनी फुटीरतावादी गटांना प्रशिक्षण दिल्याचं NIA ने दिल्ली कोर्टाला सांगितलं. ड्रोन वापरून स्फोट घडवणे आणि शस्त्रं चालवण्याचं ट्रेनिंगही त्यांनी दिलं. म्यानमारमधून कारवाया करणाऱ्या फुटीरतावादी संघटनांना त्यांनी मदत केली होती. अटक करण्यात आलेला अमेरिकन नागरिक मॅथ्यू वॅनडाईक (Matthew VanDyke) याने या ट्रेनिंगमध्ये थेट सहभाग घेतल्याचं NIA ने स्पष्ट केलं. या लोकांच्या कारवायांमुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता, असंही NIA ने कोर्टात सांगितलं. यानंतर कोर्टाने सातही आरोपींना ११ दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे.