VIDEO : सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केल्यास होणार कडक कारवाई, पोलिसांनी जारी केले गाइडलाइन्स

| Published : Dec 08 2023, 02:49 PM IST / Updated: Dec 08 2023, 02:59 PM IST

jammu kashmir
VIDEO : सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केल्यास होणार कडक कारवाई, पोलिसांनी जारी केले गाइडलाइन्स
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Social Media : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे या प्लॅटफॉर्मच्या गैरवापरामध्येही लक्षणीय वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेत जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला पोलिसांनीही सोशल मीडियाच्या वापराबाबत गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

 

Social Media Misuse : सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापराबाबत जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बारामुल्ला पोलिसांनी (Baramulla Police) महत्त्वपूर्ण पाऊल उचलत काही सूचना जारी केल्या आहेत. सोशल मीडियाचा (Social Media Use) वापर करताना कोणत्या-कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे सांगण्याचा प्रयत्न बारामुल्ला पोलिसांनी याद्वारे केला आहे. 

बारामुल्ला पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट, याच पोस्ट एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणे आणि व्हायरल करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील. सोशल मीडियावर दहशतवाद तसेच दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतील तसेच या सर्व गोष्टी रोखण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.

कोणत्या प्रकारच्या पोस्टवर होईल कारवाई?

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “भारतीय दंड संहितेनुसार (IPC) आता कोणत्याही प्रकारच्या डिजिटल उपकरणाद्वारे दहशतवादाला प्रोत्साहन देणारी पोस्ट शेअर करणे, लाइक करणे तसेच व्हायरल करणे हा गुन्हा आहे. जर एखाद्या व्यक्तीने दहशतवादाला प्रोत्साहन देणारी कोणतीही पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. प्रत्येकाला हे समजले पाहिजे की दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट कोणत्याही परिस्थितीत शेअर केल्या जाऊ नयेत. अन्यथा पोलीस तात्काळ कारवाई करतील”.

पोलिसांनी केलीय पूर्ण तयारी

बारामुल्लातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पोलिसांनी अशा प्रकारच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. भविष्यात कोणीही असे कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 

दहशतवाद, फुटीरतावादी किंवा देशविरोधी कारवायांशी संबंधित कोणतेही मेसेज आपल्या मोबाइलवर आल्यास आणि त्यामध्ये आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नसेल तर त्वरित परिसरातील पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. जेणेकरून मेसेज पाठवणाऱ्या व्यक्ती किंवा ग्रुपवर पोलीस कारवाई करू शकतील”.

आणखी वाचा :

श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 3 हजार VVIPना आमंत्रण, यादीत आहेत ही मोठी नावं

Javeria Khanum : जवेरियाचा भारतीय तरुणाला लव्हेरिया! आणखी एक पाकिस्तानी तरुणी होणार भारताची सून

Jammu-Kashmir: राजौरीमध्ये दहशतवाद्यांचे 2 साथीदार अटकेत, दारूगोळाही जप्त