नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर होऊन नाना सुखरूप

| Published : Apr 10 2024, 11:30 AM IST / Updated: Apr 10 2024, 11:31 AM IST

Nana Patole

सार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. भंडारा शहरालगत भिलवाडा येथे हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. भंडारा शहरालगत भिलवाडा येथे हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी नाना पटोले हे त्यांच्या प्रचाराचा कार्यक्रम करून परत येत होते. सुकळी या गावी जात असताना त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली असून या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

घटनास्थळी काय घडले? 
या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे. चालकाचे ट्र्कवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही जणांनी हा घातपात असू शकतो असे म्हटले आहे. 

अतुल लोंढे यांनी काय म्हटले? 
अपघात एवढा भयानक होता की नाना पटोले यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. अतुल लोंढे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ""विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत."
आणखी वाचा - 
छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 12 मजुरांचा झाला घटनास्थळी मृत्यू
'Hiring Junior Wife! अनुभवही नको'; लिंक्डइनवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया