सार

चेन्नई-मुंबई इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर खळबळ उडाली. यामुळे विमानाचे आपत्कालीन स्थितीत लँडिंग करावे लागले. याशिवाय देशातील काही विमानतळांवर बॉम्ब असल्याचीही सूचना देण्यात आली होती.

Bomb Threat : चेन्नई येथून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाला मंगळवारी रात्री 10 वाजून 24 मिनिटांनी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंगनंतर विमानाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून तपासणी केली. इंडिगो विमानाच्या 6E 5149 मध्ये एकूण 149 प्रवासी आणि चालक दलातील सात सदस्य होते.

सर्व प्रवाशांना सुखरुप उतरवले
इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी विमानाला बॉम्बने उडवण्याच्या धमकी प्रकरणात म्हटले की, सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितरित्या उतरवण्यात आले होते. प्रवाशांना उतरवल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण तपासात मदत केली. सर्व सुरक्षिततेची तपासणी झाल्यानंतर विमान विमानतळावर आणण्यात आले.

41 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी
इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याच्या धमकीआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशभरातील 41 विमानतळांवर बॉम्ब असल्याचे ईमेल आले होते. खरंतर, सर्व ईमेल बनावट असल्याचे नंतर तपासाअंती समोर आले. रिपोर्ट्सनुसार मुंबई विमानतळाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगण्या आले की, धमकीचे ईमेल आल्यानंतर विमानाच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही.

प्रत्येक विमानतळाला एकसारखाच धमकीचा मेसेज
सर्व विमानतळांना मिळालेल्या ईमेलमध्ये एकसमानच मेसेज लिहिला होता. मेसेजमध्ये म्हटले होते की, सर्व विमानतळावर स्फोटके लपवण्यात आली आहेत. बॉम्ब लवकरच फुटतील. तुमच्या सर्वांचा जीव धोक्यात आहे. या सर्व धमकीच्या ईमेलमागे केएनआर नावाच्या एका ऑनलाइन ग्रुपचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

3 जूनला अकासा एअरला उडवण्याची धमकी
3 जूनला दिल्ली-मुंबई दरम्यान उड्डाण करणाऱ्या अकासा एअरच्या एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. यानंतर विमान अहमदाबादच्या दिशेने वळवण्यात आले होते. 2 जूनला पॅरिस-मुंबई मार्गाने चालवल्या जाणाऱ्या विस्ताराच्या एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. यानंतर मुंबई विमानतळावर विमानचे आगमन होण्याआधी आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली होती. याशिवाय 1 जूनला चेन्नई येथून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी विमानात 172 प्रवासी होते. धमकीनंतर विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.

आणखी वाचा : 

शेतकऱ्यांनो तुमच्या खात्यात २००० रुपये आले का?, मोदींनी एक बटन दाबले अन् २० हजार कोटी केले वळते

Bridge Collapse Viral Video : 12 कोटी खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला, ब्रीज कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल