सार
मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारासाठी शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा पोहचला आहे. सध्या अन्सारीच्या घराबाहेर, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कठोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Mukhtar Ansari Death : उत्तर प्रदेशातील मऊ येथील माजी आमदार आणि कुख्यात गुंड मुख्यात अन्सारीचे गुरूवारी (28 मार्च) निधन झाले. मुख्तारला हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) येत निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर बांदा वैद्यकीय कॉलेजमध्ये मुख्तार अन्सारीचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह उमर अन्सारीकडे सोपवण्यात आला. शनिवारी (30 मार्च) मुख्यात अन्सारीवर अत्यंसस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी कुख्यात गुंड आणि राजकीय नेता मोहम्मद शहाबुद्दीनचा (Mohammad Shahabuddin) मुलगा ओसामा (Osama) पोहोचला आहे.
स्मशानभूमीत केवळ परिवाराला उपस्थितीत राहण्याची परवानगी
मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारासाठई केवळ परिवारातील सदस्यांनाच स्मशानभूमीत उपस्थितीत राहण्याची परवानगी असणार आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी आधीच निर्देशन दिले आहेत की, परिवारातील सदस्यांव्यतिरिक्त स्मशानभूमीत कोणीही जाणार नाही. सध्या अन्सारीच्या घराबाहेर, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे. याशिवाय काही रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
मुख्तार अन्सारीच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी
मुख्तार अन्सारीचा मृतदेह गाझीपुरमधील मोहम्मदाबाद येथे आल्यानंतर अत्यंसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली आहे. अन्सारीच्या घराबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. याशिवाय मुख्तार अन्सारी जिंदाबादच्या घोषणाही समर्थकांकडून केल्या जात आहेत.
गाझीपुर जिल्ह्यातील अन्सारीचा जन्म
हत्या, खंडणी वसूली अशा काही गुन्हांमध्ये दोषी आढळलेल्या मुख्तार अन्सारीचा जन्म गाझीपुर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे झाला होता. मुख्तारच्या वडिलांचे नाव सुबहानउल्लाह अन्सारी आणि आईचे नाव बेगम राबिया होते. गाझीपुरमध्ये मुख्तार अन्सारीच्या परिवाराची ओळख एक राजकीय पक्ष म्हणून आहे. 17 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिलेल्या अन्सारीचे आजोबा डॉक्टर मुख्तार अहमद अन्सरी स्वातंत्र्य सेनानी बोते. गांधीजींसोबत काम करत असताना ते वर्ष 1926-27 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते.
आणखी वाचा :
भारतातले सुमारे 83% तरुण बेरोजगार, वाचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल
गायीची विक्री झाली तब्बल 40 कोटींना, आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील शेतकरी झाला मालामाल