पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची घेतली भेट

| Published : Jun 05 2024, 04:23 PM IST

modi rashtapati bhavan

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला लोकसभा 2024 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने भाजपने सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरु केली. त्यासाठी त्यांना एनडीएचे घटक पक्ष नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांची सोबत लागणार आहे.

 

आज 17 व्या लोकसभेची मुदत संपत असल्याने नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत, तेथे त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी तयारीला लागतील असे म्हटले जात आहे. राष्ट्रपती सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला बहुमत स्थापन करण्यासाठी बोलावतील त्यानंतर बुहमत चाचणी घेतली जाईल असे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने चारसो पारचा नारा दिला खरा परंतू नरेंद्र मोदी यांच्या एनडीएला आता अब की बार आघाडी सरकार स्थापन करावे लागणार आहे. कालच एनडीएच्या घटक पक्षांशी बोलणी सुरु केली आहेत.

लोकसभा निवडणूकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला एकट्याला बहुमताचा 272 हा जादुई आकडा काही पार करता आला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूची गरज लागणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी 17 लोकसभेची मुदत संपत असून त्यासाठी नवे सरकार स्थापन करण्यापूर्वी राष्ट्रभवन गाठले आहे. दुसरीकडे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही दलांच्या बैठकांचा जोर दिल्लीत सुरु झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी

येत्या 8 तारखेला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा येत्या 8 जूनला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता आहे. येत्या 8 जूनला रात्री 8 वाजता हा शपथ सोहळा होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.