सार

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असली तरीही सध्याच्या 63 खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याशिवाय भाजपने 21 टक्के नेत्यांना आधीच त्यांच्या संबंधित निवडणुकीच्या जागेवरून तिकिट कापले आहे.

Lok Sabha Election 2024 : भाजपने बुधवारी (13 मार्च) लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जारी केली आहे. या यादीमध्ये 72 पैकी 30 खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. NDTV वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट्सनुसार, पहिल्या यादीत भाजपने सध्याच्या 33 खासदार आणि दुसऱ्या यादीत 30 खासदारांना तिकिट नाकारले आहे.

दरम्यान, भाजपने (BJP) एकूण 267 उमेदवारांची घोषणा करत एकूण 63 खासदारांचा पत्ता कट केला आहे. याशिवाय 21 टक्के खासदारांना त्यांच्याच निवडणुकीच्या जागेवरून तिकिट दिले नाही. असे सांगितले जातेय की, सत्ता विरोधाच्या लाटेचा विचार करता भाजपने खासदारांचा पत्ता कट करण्याचा विचार केलाय.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 370 जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वर्ष 2019 च्या तुलनेत यंदा भाजपने 67 अधिक जागांवर विजय मिळवण्याचे टार्गेट ठेवले आहे. खरंतर, वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला होता.

यंदाच्या निवडणुकीत खासदारांचा पत्ता कट करत भाजप हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतेय की, ज्यांच्याकडून पक्षाच्या विरोधात काम केले जाईल किंवा विधाने करतील, पक्षाची प्रतिमा मलिल करू शकतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. दरम्यान, भाजपने प्रज्ञा ठाकूर, रमेश बिधूडी आणि प्रवेश वर्मा सारख्या दिग्गद नेत्यांचा पत्ता कट केला आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीत काही दिग्गज नेत्यांचा पत्ता कट
भाजपने आपल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून प्रत्येकी 20-20, गुजरात येथून 7, हरियाणातून 6-6, मध्य प्रदेशातून 5, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातून 2-2 आणि दादरा-नगर हवेली येथून एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. दिल्लीत भाजपने सध्याच्या सहा खासदारांचा पत्ता कट करत मनोज तिवारी यांना पुन्हा संधी दिली आहे.

दुसऱ्या यादीमध्ये कर्नाटकातील 20 उमेदवारांपैकी 11 खासदारांचा पत्ता कट केलाय. याशिवाय आठ जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारांचे गणित थोडे वेगळे आहे. येथे 14 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असून पाच जणांचा पत्ता कट केला आहे. दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेल्या खासदारांमध्ये नागपूर येथून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, बीड येथून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना तिकिट दिले आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीत मोठे बदल
गुजरातसाठी जारी करण्यात आलेल्या यादीत सध्याच्या सात खासदारांपैकी तीन जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश यांच्या ऐवजी मुकेश दलाल यांना संधी दिली आहे. याशिवाय हरियाणातील सहा उमेदवारांपैकी तीन जणांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून दोन जणांना पुन्हा संधी दिली आहे. तेलंगणा येथून भाजपने आधी चार जागांवर विजय मिळवला होता. तेथे एका खासदाराला पुन्हा संधी देण्यासह एका उमेदवाराला तिकिट नाकारले आहे.

मध्य प्रदेशातील पाच उमेदवारांपैकी दोन खासदारांना पुन्हा पक्षाने तिकिट देण्यासह दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एक नव्या उमेदवाराच्या रुपात विवेक साहू यांना छिंदवाडा येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.

आणखी वाचा : 

Loksabha Election 2024 : भाजपने 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, नितीन गडकरी यांना नागपूरमधून तिकीट जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केले सूरज पोर्टल, काँग्रेस सरकारने वंचितांची पर्वा केली नसल्याची केली टीका

Loksabha Election : ओडिसातील भाजप नेत्यांनी घेतली अमित शहा यांची भेट, बीजेडीसोबत युतीबाबत लवकरच घेतला जाणार निर्णय