सार

भाजपने दुसऱ्या टप्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून काही नावे जाहीर केली आहेत. 

भारतीय जनता पार्टीने दुसऱ्या टर्मचे लोकसभा निवडणुकीची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रात पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. काही भाजप खासदारांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये खासकरून नंदुरबारमधून हिना गावित, अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे, सांगलीतून संजयकाका पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरचे तिकीट मिळाले आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत 72 उमेदवारांची नावे आहेत. यापूर्वी भाजपने १९५ उमेदवारांची नावे असलेली पहिली यादी जाहीर केली होती.

तिकीट कोणाला कुठून मिळाले?

दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव

दादर आणि नगर हवेली- कलाबेन देऊळकर

दिल्ली

  • पूर्व दिल्ली- हर्ष मल्होत्रा
  • उत्तर पश्चिम दिल्ली- योगेंद्र चंडोलिया

गुजरात

  • साबरकांठा- भिखाजी दुधाजी ठाकोर
  • अहमदाबाद पूर्व- हसमुखभाई सोमाभाई पटेल
  • भावनगर- निमुबेन बांभनिया
  • वडोदरा- रंजनबेन धनंजय भट्ट
  • छोटा उदयपूर- जशुभाई भिलुभाई रावथा
  • सुरत- मुकेशभाई चंद्रकांत दलाल
  • बलसाड- धवल पटेल

हरियाणा

  • अंबाला- बंतो कटारिया
  • सिरसा- अशोक तंवर
  • कर्नाल- मनोहर लाल खट्टर
  • भिवानी-महेंद्रगड- चौधरी धरमबीर सिंग
  • गुडगाव- राव इंद्रजित सिंग यादव
  • फरीदाबाद- कृष्ण पाल गुर्जर

कर्नाटक

  • चिक्कोडी- अण्णासाहेब शंकर जोल्ले
  • बागलकोट- पी.सी. गड्डीगौडर
  • विजापूर- रमेश जिग्जिनागी
  • गुलबर्गा- उमेश जी जाधव
  • बिदर- भगवंत खुबा
  • कोप्पल- बसवराज कायवथूर
  • बेल्लारी-बी. श्रीरामुलू
  • हावेरी- बसवराज बोम्मयी
  • धारवाड- प्रल्हाद जोशी
  • दावणगेरे- गायत्री सिद्धेश्वर
  • शिमोगा- बी वाय राघवेंद्र
  • उडुपी चिकमंगळूर- कोटा श्रीनिवास पूजारी
  • दक्षिण कन्नड-कॅप्टन ब्रिजेश चौटा
  • तुमकूर-व्ही सोमन्ना
  • म्हैसूर- यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार
  • चामराजनगर- एस बलराज
  • बेंगळुरू ग्रामीण- डॉ. सी एन मंजुनाथ
  • बेंगळुरू उत्तर- कुमारी शोभा करंदलाजे
  • बेंगळुरू सेंट्रल- P.C. मोहन
  • बेंगळुरू दक्षिण- तेजस्वी सूर्या

आणखी वाचा - 
Loksabha Election : ओडिसातील भाजप नेत्यांनी घेतली अमित शहा यांची भेट, बीजेडीसोबत युतीबाबत लवकरच घेतला जाणार निर्णय
Aadhaar Update : आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, 10 वर्षे जुने आधार होणार मोफत अपडेट