सार
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पहाटेपर्यंत पीडीसीसी बँक उघडी ठेवून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आधल्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. कर्जत जामखेड लोकसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून याबद्दलच्या घडामोडींची माहिती दिली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात आल्याचा दावा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला होता. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा मॅनेजरला निलंबित करण्यात आले आहे. रोहित पवार यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने केला गुन्हा दाखल -
निवडणूक आयोगाच्या आदेशाने विनायक ज्ञानोबा तलावडे या ब्रांच मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुनेत्रा पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार या पार्टीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीसाठी उभ्या होत्या. या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची झाली. 7मे रोजी झालेल्या निवडणुकीच्या पहाटेपर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला.
आमदार रोहित पवार यांनी केले होते ट्विट -
या व्हिडिओवर कारवाई म्हणून वेल्हे येथील मॅनेजरला निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी बँकेकडून पैसे घेऊन मतदारांना वाटप होत असल्याचा आरोप केला होता. रोहित पवार यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केलेल्या ट्विटमध्ये एका गाडीमध्ये नोटांचे बंडल पडल्याचे दिसून आले होते. गरिबांना जी बँक रात्री लवकर बंद होते ती निवडणुकीच्या आदल्या दिवशी पहाटेपर्यंत उघडी कशी, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता.
आणखी वाचा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीने जिंकले मन, उपस्थित लोकांनी केला नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयजयकार
UPSC 2023 प्रिलिम्सची Answer Key झाली जाहीर, 28 मे 2023 ला झाली होती परीक्षा