सार
Bharat Rice : सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. भारत पीठ व डाळीची विक्री केल्यानंतर आता स्वस्त दरात भारत तांदूळ विकण्याची तयारी सरकार करत आहे.
Bharat Rice : स्वस्त दरात पीठ (Bharat Atta) आणि डाळीनंतर (Bharat Dal) आता सर्वसामान्यांकरिता भारत राइस (Bharat Rice) देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसू नये, याकरिता केंद्र सरकारने संपूर्ण तयारी केली आहे.
कितीही महागाई वाढली असली तरी सर्वसामान्यांना परवडणारे अन्नधान्य उपलब्ध असावे, यासाठी सर्व वस्तू सवलतीच्या दरात विकल्या जात आहेत. कांदा आणि टोमॅटोचीही स्वस्त दरात विक्री सुरू करण्यात आली आहे.
भारत राइसची (Bharat Rice) किंमत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रक्रियेशी संबंधित असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत राइस 25 रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे. हा तांदूळ सरकारी यंत्रणांमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे.
यासाठी नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (National Agricultural Cooperative Marketing Federation of India), नॅशनल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (National Cooperative Consumers’ Federation of India Ltd), केंद्रीय भंडार दुकाने आणि मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून तांदळाची विक्री करण्याची तयारी सुरू आहे.
तांदळाचे दर 14 टक्क्यांनी महागले
तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी भारत राइस विकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाचे दर 14.1 टक्क्यांनी महागले असून किंमत 43.3 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. दरम्यान भारत राइसच्या विक्रीची प्रक्रिया डाळ (Bharat Dal) आणि पीठ (Bharat Atta) याप्रमाणेच असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आणखी कोणकोणत्या गोष्टींची सरकारकडून केली जातेय विक्री?
केंद्र सरकारकडून सध्या पीठ आणि चण्याच्या डाळीची स्वस्त दरात विक्री करण्यात येत आहे. सरकारी संस्थेशी संबंधित असणाऱ्या दुकानांमध्ये पीठ 27 रुपये 50 पैसे प्रति किलो तर डाळ 60 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. याकरिता देशभरात 2 हजार रिटेल पॉइंट उभारण्यात आले आहेत. याशिवाय कांदा, टोमॅटोची देखील सरकार स्वस्त दरात विक्री करत आहे.
आणखी वाचा :
Success Story : नोकरी सोडून हा तरुण विकतोय गाढविणीचे दूध, व्यवसायामुळे झाला लक्षाधीश
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर निर्मितीमुळे रोजगार वाढला, फुल विक्रेत्यांना अच्छे दिन - स्थानिक