सार

आयुष्यात यश मिळवायचे असेल तर मित्रांनो कष्टाला पर्याय नाही. जीवनात ठरवलेले लक्ष्य गाठायचे असेल तर मेहनत करावीच लागेल. श्रीनिवास गौडा या तरुणानंही कष्ट करून स्वतःचा व्यवसाय उत्तमरित्या वाढवला, जाणून घेऊया त्याची यशोगाथा…

Success Story In Marathi : आयुष्यात यशाचे शिखर गाठायचे असेल तर प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहेच. शिवाय अंगी जिद्द व आत्मविश्वास असणेही गरजेचं आहे. श्रीनिवास गौडा या तरुणानेही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगली नोकरी सोडली. कारण त्याला जीवनात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. 

जेव्हा त्यानं नोकरी सोडण्याचा निर्णय आपल्या कुटुंबीयांना सांगितला, तेव्हा घरातल्यांनी यास नकार दिला. नशिबाने चांगली नोकरी मिळाली तर ती जाऊ देऊ नये, नोकरी करता-करताच हळूहळू यश मिळेल, असे त्याच्या घराच्यांचे म्हणणे होते.

सर्वांनी उडवली खिल्ली

पण त्याने आपल्या मनाचे ऐकले आणि नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातच त्याने व्यवसायासाठी निवडलेल्या पर्यायामुळे परिवारातील सदस्यांच्या रागाचा पारा आणखी चढला. सर्वांनी श्रीनिवासची चेष्टा केली. त्याची कल्पना कशी यशस्वी होऊ शकणार नाही, यावरून सर्वांनी त्याला कित्येक गोष्टी ऐकवल्या. पण श्रीनिवासने या सर्वांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आणि आज तो लक्षाधीश झाला आहे.

वर्ष 2002मध्ये नोकरी सोडून फार्महाऊस केले सुरू

ही यशोगाथा आहे कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या श्रीनिवास गौडाची. श्रीनिवासची यशोगाथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. कधी कधी चौकटीबाहेर पडून केलेल्या कामामुळेही यशाचे शिखर गाठता येऊ शकते, याचेच जिवंत उदाहरण म्हणजे श्रीनिवास. श्रीनिवास गौडा या तरुणाने वर्ष 2002 मध्ये नोकरी सोडून फार्महाऊस सुरू केले.

17 लाख रुपयांची मिळाली ऑर्डर

श्रीनिवासने आपल्या फार्महाऊसवरील गाढवांची (Donkey Farm) देखभाल करण्यासाठी काही लोकांना कामावर ठेवले. नशिबाचीही त्याला साथ मिळाले आणि मिळालेले पहिले यश देखील सुखद धक्का देणारे होते. फार्महाऊस सुरू केल्यानंतर केवळ पाच दिवसांत श्रीनिवासला तब्बल 17 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली. एका कंपनीला गाढविणीच्या दुधाचा पुरवठा करण्याचे कंत्राट त्याला मिळाले.

श्रीनिवासने सुरू केले देशातील पहिले डाँकी फार्महाऊस

श्रीनिवासला अल्पावधीतच आपल्या व्यवसायात मोठे यश मिळाले. या यशाबद्दल श्रीनिवासने सांगितले की, जेव्हा मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना गाढव पालनाचा व्यवसाय करण्याची कल्पना दिली, तेव्हा सर्वांनी मिळून माझी खिल्ली उडवली. पुढे श्रीनिवासने असेही सांगितले की, त्याने सुरू केलेले हे फार्महाऊस देशातील पहिले डाँकी फार्महाऊस आहे. 20 गाढवांपासून त्याने सुरू केलेल्या व्यवसायामुळे त्याने आज मोठे यश मिळवले आहे. 

जगात सर्वात महाग गाढविणीचे दूध

तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण गाढविणीचे दूध जगात सर्वात महाग दूध असते. परदेशात गाढविणीच्या दुधाची किंमत प्रतिलिटर 10 हजार रुपयांपर्यंत आहे. पण भारतात गाढविणीच्या दुधाची मागणी खूपच कमी आहे, पण या दुधाचे दर खूप महाग आहेत. गाढविणीच्या दुधापासून तयार केलेले चीजही खूप महाग असते. गाढविणीच्या दुधात पोषकघटकांसह खनिजांचा मोठा साठा असतो. त्यामुळे या दुधास मोठी मागणी आहे.

आणखी वाचा :

Vastu Tips : मनी प्लाँट चोरणे योग्य की अयोग्य? कधीही करू नका या 5 चुका

दरवर्षी डिसेंबर महिन्यातच COVID-19चा नवा व्हेरिएंट का आढळतो? जाणून घ्या कारणे

रक्तशुद्धी करायचीय? मग जाणून घ्या हे नैसर्गिक रामबाण उपाय