18व्या लोकसभा निवडणुकीचे निकास जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने पूर्ण बहुमत मिळवले आहे. एनडीएला 291 जागा मिळाला आहेत. तर इंडिया आघाडीला 234 जागांवर विजय मिळवता आला आहे. यंदाच्या वेळी 96.88 कोटी मतदारांपैकी 64.2 कोटी मतदारांनी मतदान करत रेकॉर्ड केला आहे.
- Home
- India
- Lok Sabha Elections 2024 Results : तिसऱ्यांदा NDA सरकार स्थापन होणार, इंडिया आघाडीची देशात उत्तम कामगिरी
Lok Sabha Elections 2024 Results : तिसऱ्यांदा NDA सरकार स्थापन होणार, इंडिया आघाडीची देशात उत्तम कामगिरी
Lok Sabha Elections 2024 Results : 1 जूनला लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान पार पडले. अशातच आज (4 मे) निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आल्याचे पाहिले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा येणार असून एनडीला 300-350 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी वरचढ ठरू शकते. पण महायुतीच्या जागा कमी होतील असा अंदाज आहे.
- FB
- TW
- Linkdin
सत्ता स्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत सुरु असलेल्या पत्रकार परिषदेवेळी म्हटले आहे. याशिवाय उद्या इंडिया आघाडीचा नेता ठरला जाईल असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई उत्तर पश्चिम येथून महायुतीचे रविंद्र वायकर येथून 48 मतांनी विजयी झाले आहेत.
उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. येथूनच उद्धव ठाकरे मीडियाशी संवाद साधणार असल्याचे बोलले जात आहे. तत्पूर्वी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये.
उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने देण्यात आली होती. नागरिकांनी उद्धव ठाकरेंवर विश्वास दाखवत खरी शिवसेना कोणती हे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया युबीटी नेने अरविंद सावंत यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना भवनाकडे निघण्यासाठी वांद्रे येथून रवाना झाले आहेत. खरंतर, शिवसेनेचा महाराष्ट्रात विजय झाल्याचा उत्साह प्रत्येक शिवसैनिकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
भारताच्या जनतेने एनडीएवर तिसऱ्यांदा विश्वास दर्शवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी केवळ आता बीड आणि उत्तर पश्चिम मुंबईतील निकाल येणे बाकी राहिले आहे.
जालन्यात 35 वर्षांचा अभेद्य बुरुज ढासळला आहे. येथून निवडणुकीचे तिकीट देण्यात आलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहेय
अहमदनगर येथून महाविआचे निलेश लंके विजयी झाले आहेत.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात पोस्टल मतदानांची मतमोजणी सुरु झाली आहे.
साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
विदर्भात एनडीएची 9 जागांवरुन 2 जागांवर घरसण झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह विजयी उमेदवार मातोश्रीवर पोहोचले आहेत.
हातकणंगले येथील महायुतीचे धैर्यशील माने यांचा विजय झाला आहे.
सोलापूर येथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे.
रत्नागिरी येथे नारायण राणे विजयी झाले आहेत.
रायगड येथून सुनील तटकरे विजयी झाले आहेत.
उत्तर मध्य मुंबई येथून वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्वल निकम उभे होते तर त्यांचा आता पराभव झाला आहे.