सार
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी झालेल्या हिंसाचामुळे मणिपूरमध्ये 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.ईव्हीएमची तोडफोड केल्यानं फेर मतदानाचा विचार करण्यात आला यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी झालेल्या हिंसाचामुळे मणिपूर मध्ये 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ईव्हीएमची तोडफोड केल्यानं फेर मतदानाचा विचार करण्यात आला असून यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान 26 एप्रिल रोजी मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील मतदान व्यस्थित झाले नसल्याने मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी हा निर्णय घेतला. मणिपूर मधील 11 केंद्रांवर फेर मतदान होणार आहे. यावेळी काळजी संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
22 एप्रिल रोजी पुन्हा होणार मतदान :
सीईओच्या आदेशानुसार आणि घोषणेनुसार या स्थानकांवर 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान होणार आहे. जमावाकडून हिंसाचार, दंगली आणि तोडफोड झाल्याच्या अनेक रिपोर्ट्सनंतर, या 11 मतदान केंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. त्यापैकी खुरई विधानसभा मतदारसंघात दोन मतदान केंद्रे, क्षेत्रगावमध्ये चार आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजू येथे एक आणि उरीपोकमध्ये तीन आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील कोंथौजममध्ये एक मतदान केंद्र आहेत.