Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी भोपाळ येथून तिकिट न दिल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या....

| Published : Mar 04 2024, 11:58 AM IST / Updated: Mar 04 2024, 12:00 PM IST

Bhopal MP Sadhvi Pragya Singh Thakur
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी भोपाळ येथून तिकिट न दिल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या....
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच भोपाळ येथून तिकिट न मिळाल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Lok Sabha Election 2024 : भाजपने(BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकूण 195 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली जारी करण्यात आलेल्या यादीत काही जुन्या उमेदवारांचा पत्ता कट केला आहे. त्यापैकीच एक म्हणजे भोपाळच्या (Bhopal) खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर (Pragya Singh Thakur) यांच्या नावाचा समावेश आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी आपल्याला तिकिट न दिल्याने भावना व्यक्त केल्या आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, भुतकाळात केलेल्या काही टिप्पण्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असतील. यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या पाहिल्या यादीत स्थान देण्यात आले नाही.

इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, रविवारी (3 मार्च) प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी म्हटले, पंतप्रधान म्हणाले होते माझ्या शब्दांच्या वापरामुळे माफ केले जाणार नाही. मी आधीही तिकिट मागितली नव्हती ना आता मागत आहे. माझ्या आधीच्या विधानांमध्ये अशा काही शब्दांचा वापर करण्यात आलाय ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाले आहेत. दरम्यान, मी काही असे शब्द वापरले होते त्याबद्दल आधीच माफी मागितली होती.

माजी महापौर आलोक शर्मांना दिले तिकिट
भाजपने शनिवारी (2 मार्च) भोपाळ येथून प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या ऐवजी माजी महापौर आलोक शर्मा यांना लोकसभेचे तिकिट दिले आहे. याशिवाय प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्या सप्टेंबर 2008 मध्ये मालेगाव येथील बॉस्बस्फोटाप्रकरणातील खटल्याचा सामना करत आहेत. तरीही प्रज्ञा सिंह यांना भाजपने 2019 मध्ये तिकिट दिले होते.

दरम्यान, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीआधी प्रज्ञा सिंह यांनी अशोक चक्र विजेते आणि महाराष्ट्राचे दहशविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांची तुलना पौराणिक कथांमधील रावण आणि कंसासोबत केली होती. याशिवाय 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल केलेल्या टिप्पणीवरुन वाद अधिक चिघळला गेला होता. यामुळेच निवडणूक आयोगाने प्रज्ञा सिंह यांना कारणे दाखवा नोटीस धाडली होती.

आणखी वाचा : 

Rameshwaram Cafe : बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाची एनआयएकडे दिली जबाबदारी, गृह मंत्रालयाने दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसात पाच राज्यांना भेट देणार, जाणून घ्या दौऱ्याचे वेळापत्रक

Loksabha Election 2024 : सरपंचपासून थेट लोकसभेचे तिकीट, कोण आहेत भाजपच्या उमेदवार लता वानखेडे?

Read more Articles on