पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसात पाच राज्यांना भेट देणार, जाणून घ्या दौऱ्याचे वेळापत्रक

| Published : Mar 04 2024, 10:23 AM IST / Updated: Mar 04 2024, 11:54 AM IST

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसात पाच राज्यांना भेट देणार, जाणून घ्या दौऱ्याचे वेळापत्रक
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्चदरम्यान पाच राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान काही प्रकल्पांच्या उद्घाटनासह पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

PM Narendra Modi Visit Timetable : आगामी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देभरातील राज्यांचे दौरे करत आहेत. सोमवारपासून (4 मार्च) तीन दिवस पंतप्रधान पाच राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान तेलंगणा, तमिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारचा दौरा करणार आहेत. याशिवाय हजारो कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे वेळापत्रक
पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणानंतर आदिलाबाद येथे सर्वप्रथम भेट देणार आहेत. सोमवारी सकाळी 10.30 वाजता येथे 56 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. यानंतर पंतप्रधान तमिळनाडूला भेट देणार आहेत. तमिळनाडूतील भाविनी येथे दुपारी 3.30 वाजता पोहोचतील. येथे देखील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

5 मार्चला तेलंगणात कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 5 मार्चला तेलंगणात काही कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. मंगळवारी (5 फेब्रुवारी) सकाळी हैदराबाद येथील नागरी विमान वाहतूक संशोधन संस्था केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर सकाळी 11 वाजता तेलंगणातील संगारेड्डी येथे 6,800 कोटी रुपयांच्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.

तेलंगणानंतर पंतप्रधान ओडिशात दाखल होणार आहेत. येथे आल्यानंतर दुपारी 3.30 वाजता जाजपुरमधील चंडीखोले येथे 19,600 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आलेल्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत.

6 मार्चला बंगाल आणि बिहारचा दौरा
येत्या 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांचा पश्चिम बंगालला भेट देणार आहेत. बुधवारी सकाळी 10.15 वाजता पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या काही कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी करणार आहेत. यानंतर दुपारी 3.30 वाजता बिहारला दाखल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील बेतिया येथे 8,700 कोटी रुपयांच्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकापर्ण आणि पायाभरणी करणार आहेत.

आणखी वाचा : 

Loksabha Election 2024 : सरपंचपासून थेट लोकसभेचे तिकीट, कोण आहेत भाजपच्या उमेदवार लता वानखेडे?

Prime Minister Narendra Modi : पश्चिम बंगाल दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलांबद्दलची ओढ दिसली, हजारोंच्या गर्दीतून एका चिमुरडीची स्वीकारली भेट

'पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ही विश्वासघाताची हमी', लोकसभेच्या जागेंच्या घोषणेनंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली टीका